शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
4
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
5
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
6
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
9
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
10
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
11
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
12
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
13
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
14
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
15
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
16
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
17
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
18
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
19
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
20
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला

लोकप्रतिनिधींसाठी प्रशिक्षण केंद्रे उभारावी

By admin | Published: July 06, 2017 3:41 AM

राजकारणातून उच्चशिक्षित आणि चारित्र्यसंपन्न लोकप्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेत पाठवले पाहिजेत. त्यासाठी देशभरात विविध

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राजकारणातून उच्चशिक्षित आणि चारित्र्यसंपन्न लोकप्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेत पाठवले पाहिजेत. त्यासाठी देशभरात विविध ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे उभारली जावीत, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी व्यक्त केली. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे हजारे यांनी या वेळी सांगितले.माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंटतर्फे केंद्रीय यूपीएससी परीक्षेत देशातून पहिली आलेली नंदिनी के. आर. आणि तिसरा आलेला गोपालकृष्ण रोनांकी यांच्यासह इतर यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी माईर्स एमआयटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, तेलंगणातील पोलीस अधिकारी महेश भागवत, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालास्वामी, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी चेअरमन डी. पी. अगरवाल उपस्थित होते.अण्णा हजारे म्हणाले, ‘‘नव्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची कथनी आणि करनी एक असेल तर देश बदलण्यास वेळ लागणार नाही. देशात चारित्र्यसंपन्न अधिकारी निर्माण झाले तर गेल्या ७० वर्षांत देशात जे कार्य झाले नाही ते कार्य अवघ्या १० वर्षांत देश बदलू शकेल.’’सत्काराला उत्तर देताना नंदिनी के. आर. म्हणाली, की प्रेरणा, प्रयत्न आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर यश प्राप्त होते. यशप्राप्तीनंतर आपली पाळेमुळे विसरता कामा नयेत. मुलांचा कल जिकडे असेल त्या क्षेत्रात यशप्राप्तीसाठी आपल्या मुलांना सर्व पालकांनी प्रोत्साहन द्यावे.या वेळी विश्वनाथ कराड, मेजर जनरल दिलावर सिंग, गोपाळकृष्ण रोनांकी यांनी मनोगत व्यक्त केले. राहुल विश्वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले. शैलश्री हरिदास यांनी प्रास्ताविक केले. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. सुजीत धर्मपात्र यांनी आभार मानले. फक्त भाषणाने समाज बदलत नाहीनिवडणुका आल्या की आपल्याकडे दोन-दोन तास फक्त भाषणांचा भडिमार जनतेवर होतो. मात्र भाषणाने समाज बदलत नाही, त्याला शब्द आणि कृतीची जोड लागते, असा टोला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राजकीय नेत्यांना लगावला.समाजाकडून तुमच्याबद्दल भरपूर अपेक्षा आहेत. यंत्रणेमध्ये काम करताना अविरत कष्ट आणि प्रामाणिकपणे कार्य करावे. आपली निर्णयक्षमता व इच्छाशक्तीच्या जोरावर चांगले प्रशासन येऊ शकते. आपले निर्णय समाजाभिमुख कसे असतील, यावर अधिक लक्ष केंद्रित करावे.- डी. पी. अगरवालयूपीएसी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत प्रामाणिकपणे काम करून चांगले प्रशासन निर्माण करावे. सतत नवीन गोष्टी शिकून आपल्या कामाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करावा. नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे आपला अधिक कल असायला हवा.- एन. गोपालास्वामी