शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

उद्धव ठाकरेंना धक्का! चंद्रकांत खैरेंना कंटाळून शिवसेना नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 10:13 AM

उद्धव ठाकरेंबद्दल माझे प्रेम आणि आदर कायम राहील असं शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या जाधव यांनी म्हटलं आहे.

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडल्याचं चित्र आहे. विधानसभेचे ४० आमदार आणि लोकसभेच्या १२ खासदारांनी याआधीच शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेतील पदाधिकारीही शिंदे गटात सहभागी होत आहे. शिंदे यांच्या बंडाचा सर्वाधिक फटका मराठवाड्यात बसला आहे. याठिकाणी बहुतांश शिवसेना आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आता शिवसेनेचे लातूरचे माजी जिल्हाप्रमुख बळवंत जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. 

उद्धव ठाकरेंबद्दल आपल्याला आदर आहे. त्यांच्याबाबत आदर कमी झाला नसून औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या कारभाराला कंटाळून मी शिंदे गटात सहभागी होत असल्याचं बळवंत जाधव यांनी सांगितले. "खैरे यांच्या नेतृत्वावर मी नाराज आहे. त्यांनी लातूरमध्ये शिवसेनेला कमी करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंबद्दल माझे प्रेम आणि आदर कायम राहील. शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पावले उचलली आहेत असं जाधव यांचं म्हणणं आहे. बळवंत जाधव हे माजी राज्यमंत्री दिवाकर रावते यांचे निकटवर्तीय मानले जाते.

शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करू नये. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला नेहमी आघाडीनं नाकारलं आहे असं जाधव यांनी म्हटलं. बळवंत जाधव हे २००० ते २००३ पर्यंत लातूर जिल्हाप्रमुख होते. त्याचसोबत २०१६ ते २०१८ पर्यंत जिल्हा समन्वयक म्हणूनही बळवंत जाधव यांनी जबाबदारी सांभाळली. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी पक्षाचे नांदेड जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांची हकालपट्टी केली. मागील जून महिन्यात एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं. ज्यामुळे राज्यातील ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागलं. 

त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत हातमिळवणी करत राज्यात नवीन सरकार स्थापन केले. ३० जून रोजी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर माजी मंत्री आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी राज्यभर निष्ठा यात्रा काढली. यावेळी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जात त्याठिकाणी शक्तीप्रदर्शन केले. हे सरकार बेकायदेशीर असून जास्त काळ टिकणार नाही. शिंदे सरकार लवकरच कोसळणार असा दावा आदित्यकडून सातत्याने केला जात आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेChandrakant Khaireचंद्रकांत खैरेEknath Shindeएकनाथ शिंदे