- जितेंद्र कालेकर
ठाणे, दि. 30 - गणोशोत्सव आणि बकरी ईदच्या बंदोबस्ताचा आढावा घेत प्रलंबित गुन्हयांचा निपटारा तातडीने करा, असे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी ठाणे पोलीस आयुक्तांसह सर्व वरीष्ठ पोलीस अधिका-यांच्या बैठकीत दिले. यावेळी संपूर्ण आयुक्तालयातील गुन्हयांचा आढावाही त्यांनी घेतला. पोलीस महासंचालक पदाची सूत्रे घेतल्यानंतर माथूर यांनी प्रथमच सोमवारी ठाणो पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. यावेळी आयुक्तांच्या दालनात त्यांनी सायंकाळी 6 ते 7.30 या दरम्यान बैठक घेतली. यावेळी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रतापसिंग पाटणकर, शरद शेलार, वाहतूक शाखेचे उपायुक्त संदीप पालवे, डॉ. रश्मी करंदीकर (मुख्यालय), संदीप भाजीभाकरे, पराग मणोरे (गुन्हे अन्वेषण विभाग), अभिजीत त्रिमुखे (ठाणो शहर), सुनिल लोखंडे (वागळे इस्टेट) यांच्यासह सर्व पोलीस उपायुक्त यावेळी उपस्थित होते. आगामी गणोशोत्सवाच्या दृष्टीने यावेळी महासंचालकांनी आपल्या अधिका:यांना महत्वपूर्ण सूचना केल्या. ब:याचदा गणपती बंदोबस्ताचे नियोजन गेल्या तीन वर्षातील घटनांचा आढावा घेऊन केले जाते. तसे न करता अगदी दहा वर्षापूर्वीच्या घटना, बंदोबस्तामधील त्रुटींचाही अभ्यास करुन तसे नियोजन करावे. राज्य पोलीस मुख्यालयाकडे जादा मनुष्यबळाची मागणी करतांना बंदोबस्ताचे योग्य नियोजन करावे, वास्तविक तशी गरज आहे का? याची पडताळणी करावी. मंडळाचे नेमके पदाधिकारी आणि त्यांचे सल्लागार (मुख्य सूत्रधार) यांचीही पोलीस ठाण्याच्या पातळीवर सर्व माहिती असणो आवश्यक आहे णरायाचे आगमन, विसर्जनाच्या वेळा आणि मिरवणूकीच्या मार्गाची इथ्यंभूत माहिती सर्व उपायुक्तांसह अधिका:यांकडे असावी. विसर्जनाच्या वेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील जादा रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात. तसेच विसर्जन तलाव आणि खाडीच्या ठिकाणी जीवरक्षक (पट्टीचे पोहणारे) ठेवल्याची खात्री करावी,असेही ते म्हणाले. याशिवाय, बकरी ईदचा बंदोबस्त करतांना चेक नाक्यांवर कसून तपासणी व्हावी. जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणा:यांवर करडी नजर ठेवा. पोलिसांचे काम अन्य कोणती यंत्रणा करीत असेल तर तसे व्हायला नको. पोलिसांना नागरिकांनी मदत जरुर करावी. पण पोलिसांऐवजी नागरिकच ती कामे करीत असेल तर तसेही व्हायला नको. उत्सवांच्या अथवा इतर काळातही एखादी दुर्घटना घडली तर बंदोबस्तामध्ये सुसूत्रता हवी. घटनेच्या गांभीर्यानुसार उपायुक्त, सहायक आयुक्त, वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांनी कधी भेटी द्याव्यात याचेही नियोजन करा. अन्यथा, सर्वच अधिकारी एकाच वेळी एकाच ठिकाणी जातील. गरजेनुसार ती विभागणी करा. गेल्या सहा महिन्यांमधील ठाणो आयुक्तालयातील ठाणो शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांमधील 33 पोलीस ठाण्यांमधील गुन्हयांचा आढावा घेऊन माथूर यांनी गंभीर गुन्हयांचे आरोपपत्र लवकर दाखल करण्याच्याही सूचना यावेळी केल्या.