कवठेमहांकाळ (जि.सांगली) : देवदर्शनानंतर भाविकांना घेऊन परतणारी मिनी बस रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकवर आदळून सात जण मृत्युमुखी पडले, तर १३ जण जखमी झाले. मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर आगळगाव फाट्याजवळ शेळकेवाडी हद्दीत शुक्रवारी पहाटे ४ ला हा अपघात घडला. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. वळीवडे येथील म्हसोबाचा माळ येथील भाविक सोमवारी देवदर्शनासाठी मिनी बस व जीपने गेले होते. विजापूर, अलमट्टी धरण, बदामी, अक्कलकोट, तुळजापूर करून गुरुवारी सायंकाळी ते पंढरपूर (ता. सोलापूर) येथे आले. तेथे देवदर्शन, जेवण करून रात्रीच परत येण्यास निघाले. मिनी बसमध्ये चालकासह २0 भाविक होते. त्यांच्यासोबतची जीप पुढे निघून गेली होती. आगळगाव फाटा येथे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाळूच्या ट्रकवर बस आदळली. ही धडक एवढी जबरदस्त होती की बसचा चक्काचूर झाला. चालक संदीप यादव फरार झाला आहे. (प्रतिनिधी) मृतांची नावे- विनायक मार्तंड लोंढे (वय ५0), गौरव राजू नरदे (९), लखन राजू संकाजी (३0), रेणुका नंदकुमार हेगडे (३५), नंदकुमार जयराम हेगडे (४0), रेखा राजाराम देवकुळे (४0) आदित्य नंदकुमार हेगडे (१३, सर्व रा. मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायटी, कोयना कॉलनी, वळीवडे, गांधीनगर).जखमी : स्नेहल उर्फ नेहा कृष्णात हेगडे (२0), काजल हेगडे (१९), कल्पना बाबर (३५), कोमल हेगडे (२१), शीला हेगडे (३९), सारिका कांबळे (४0), शुभम कांबळे (८), भारती कांबळे (२0), सावित्री आवळे (५५), अनमोल हेगडे (१२), श्वेता हेगडे (१५), गौरी हेगडे (८).
ट्रकवर मिनी बस आदळून सात ठार
By admin | Published: April 22, 2017 4:32 AM