मुंबई : राज्यात उन्हाचा पारा चढत आहे, त्यात राजस्थान आणि वायव्य भारतातून उष्ण वारे गुजरात, मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्रात येत असल्याने, राज्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. १५ मार्चपासून राज्यभरात उष्माघाताचे सात बळी गेले असून, ४१८ रुग्णांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राज्यात सर्वाधिक अकोला पाठोपाठ नागपूरमध्ये उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत, तर औरंगाबाद, हिंगोली येथे प्रत्येकी दोन, परभणी, धुळे आणि बीड येथे प्रत्येकी एक अशा सात रुग्णांचा बळी गेला आहे. उष्माघात नियंत्रण कक्षाच्या नोंदीनुसार अकोल्यात १८६, नागपूर १४३, लातूर ६१, नाशिक २१, औरंगाबाद ६, पुणे १ अशा एकूण ४१८ रुग्णांचा समावेश आहे. परभणी, धुळे, बीड येथे प्रत्येकी एक, तर औरंगाबाद आणि हिंगोलीत प्रत्येकी दोन रुग्ण दगावले आहेत.उष्माघाताच्या रुग्णांसाठी कुलिंग वॉर्ड तयार करण्याचे आरोग्य विभागाचे आदेश आहेत. रक्तदाब, मधुमेह, किंवा अन्य आजाराच्या रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रुग्णांनी उन्हात बाहेर न पडता घरीच राहावे. कारण अशा रुग्णांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता अधिक आहे, असा सल्ला राज्याचे आरोग्य सहसंचालक डॉ. प्रकाश भोई यांनी दिला.अशी घ्या काळजीच्सकाळी ११ ते ४ या वेळात उन्हात काम करणे, फिरणे टाळा.च्फिक्या रंगाचे सैल व सुती कपडे घालावे.च्गॉगल, टोपी, स्कार्फचा वापरा.च्फ्रीजचे पाणी न पिता माठातले पाणी, वाळा, गुलाबाच्या पाकळ्या घालून नैसर्गिक थंड केलेले पाणी प्यावे.च्बाहेर पडताना पाण्याची बाटली जवळ ठेवावी. तापमान वाढल्यास पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.च्गरोदर स्त्रिया, कामगार व आजारी व्यक्तींनी काळजी घ्यावी.च्तहान लागण्याची वाट न बघता दररोज आठ ते दहा पेले पाणी प्यावे. नारळाचे पाणी, कैरीचे पन्हे, लिंबू सरबत, लस्सी, ताक व ओआरएसची भुकटी पाण्यात टाकून घेत राहावी.च्आहारात कलिंगड, खरबूज, लिंबू, कांदा, संत्रे यांचा वापर करावा.च्लघवीचा रंग जर जास्त पिवळसर झाला किंवा लघवीचे प्रमाण कमी झाल्यास, पाणी व वर नमूद केलेल्या पेयांचे प्रमाण वाढवावे