शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

विदर्भात वीज पडून सात जणांचा मृत्यू

By admin | Published: June 03, 2017 3:52 AM

विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात शुक्रवारी विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस झाला. विविध ठिकाणी वीज कोसळून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर/पुणे : विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात शुक्रवारी विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस झाला. विविध ठिकाणी वीज कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोन शेतकरी ठार झाले. पहिली घटना राळेगाव शेतशिवारात तर दुसरी घटना तालुक्यातील वाऱ्हा येथे घडली. वासुदेव मनवर केवटे (५८ रा. राळेगाव) आणि हनुमान बाबूराव चिव्हाणे (५६ रा. वाऱ्हा) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी भागातील देवडा परिसरात वीज पडून दोन गुराख्यांचा मृत्यू झाला. वसंता बापूराव आत्राम (४३ रा. मांडला) व उकंडराव बापूराव आत्राम (४४ रा. वर्धमनेरी) अशी मृतांची नावे आहेत. अमरावती जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी आहेत. निशांत धनराजपंत बोके (३०, रा. वरखडे ता. तिवसा), तेजस रुपराव घोटे (२२ रा. मारडा, ता. तिवसा) व बाबूराव विनायकराव देशमुख (५०, रा. देवरा, ता. तिवसा) अशी मृतांची नावे आहेत. तर विवेक मधुकर लांडगे (२२, आखतवाडा, ता. तिवसा), संजय रामचंद्र कोथळकर, छोटू कोथळकर (१५), हिमांशु सोळंके (१५, सर्व, रा. देवरा) हे गंभीर जखमी आहेत. एकाचे नाव समजू शकले नाही. जखमींवर अमरावती येथील इर्विन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेघगर्जनेसह पावसाची शक्यतायेत्या दोन दिवसात विदर्भ-मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारी महाबळेश्वर येथेसर्वात कमी १८.४ अंश सेल्सिअस तर, सर्वात जास्त तापमान चंद्रपूर येथे ४२.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. मराठवाड्यात हिंगोली व नांदेड जिल्ह्यात काही भागांत हलका पाऊस झाला. बुलडाणा येथे वीज पडून शेतात काम करणाऱ्या रुख्मींना भगवान धोंडगे यांचा मृत्यू झाला. चार जनावरेही मृत्युमुखी पडली. तर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातही वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. झुणकाबाई दशरथ ठेलारी (६५) आणि गंगा लाल्या ठाकरे (५५) अशी मृतांची नावे आहेत.