मुंबई : आघाडी आणि महायुती फुटल्यामुळे स्वतंत्रपणो निवडणूक लढविणा:या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांनी उमेदवारी देताना महिलांना जेमतेम सात टक्के वाटा दिल्याचे चित्र आहे.
मित्रपक्षांसाठी सोडलेल्या जागावगळता या चारही पक्षांनी मिळून 11क्क्हून जास्त उमेदवार मैदानात उतरविले आहेत. पण त्यात महिलांची संख्या अवघी 74 आहे. काँग्रेसने सर्वाधिक 27 महिला उमेदवारांना संधी दिली असून भाजपाकडून 21, राष्ट्रवादीकडून 16 आणि शिवसेनेकडून 1क् महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. काँग्रेस सर्वच्या सर्व 288 जागा लढवित असून राष्ट्रवादी 286, भाजपा 257 आणि शिवसेना 285 जागांवर लढत आहे.
भाजपाच्या यादीत प्रामुख्याने दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा (परळी) विद्यमान आमदार माधुरी मिसाळ (पर्वती, पुणो) यांचा समावेश असून बाकीचे नवीन चेहरे आहेत. मुंबईच्या नगरसेविका मनीषा चौधरी यांनाही भाजपाने दहिसर येथून तिकीट दिले आहे.
काँग्रेसच्या यादीत राजकीय वारसा असलेल्यांचा भरणा जास्त असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता (भोकर), वर्षा गायकवाड (धारावी), यशोमती ठाकूर (तिवसा), प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य), निर्मला गावीत (इगतपुरी) आणि अॅनी शेखर (कुलाबा) तसेच संजय देवतळे यांची भावजय आसावरी देवतळे (वरोरा) यांना काँग्रेसने संधी दिली आहे.
याशिवाय, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्ष व नगरसेविका शीतल म्हात्रे (दहिसर) तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा (मलबार हिल) यांच्यासह इतर नव्या उमेदवारांना काँग्रेसने संधी दिली आहे. (प्रतिनिधी)
महाराष्ट्रात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायद्याने 5क् टक्के आरक्षण दिलेले आहे. विधानसेभेत तसे आरक्षण देणो तर दूरच पण निवडणुकीची उमेदवारी देतानाही महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व देण्याची पुरोगामी भूमिका या प्रमुख पक्षांनी घेतली नसल्याचे दिसून येते.