मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली. त्यात सात जणांना पालकमंत्रीपद मिळू शकलेले नाही. या मंत्र्यांमध्ये संदीपान भुमरे (शिवसेना), जितेंद्र आव्हाड, प्राजक्त तनपुरे, संजय बनसोडे, दत्ता भरणे (राकाँ),राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष), विश्जित कदम (काँग्रेस) यांचा समावेश आहे.अहमदनगरमधील तनपुरे प्राजक्त, थोरात बाळासाहेब आणि गडाख शंकरराव हे तिघे मंत्री आहेत. पण त्यांच्या जिल्ह्णात बाहेरचा पालकमंत्री (हसन मुश्रीफ) देण्यात आला आहे. औरंगाबादमध्येही भुमरे संदीपानराव आणि अब्दुल सत्तार मंत्री असताना बाहेरचा पालकमंत्री (सुभाष देसाई) देण्यात आला आहे. सत्तार यांना धुळ्याचे पालकमंत्री करण्यात आले तर कॅबिनेट मंत्री भुमरे पालकमंत्र्यांच्या यादीत कुठेच नाहीत.कोल्हापूर जिल्ह्यात पाटील राजेंद्र, मुश्रीफ हसन आणि पाटील सतेज हे तिघे मंत्री असताना अहमदनगरचे बाळासाहेब थोरात यांना येथे पालकमंत्री करण्यात आले. मुश्रीफ यांना अहमदनगरचे तर सतेज पाटील पाटील याना भंडाऱ्याची जबाबदारी देण्यात आली.मुंबई उपनगरात ४ मंत्री आहेत, पण मुंबई शहरातील आदित्य ठाकरे यांना येथील पालकमंत्री नेमण्यात आले. उपनगरातील सुभाष देसाई (औरंगाबाद), अस्लम शेख (मुंबई शहर), नवाब मलिक (परभणी), अनिल परब अनिल (रत्नागिरी) या सर्वांना इतर जिल्ह्णांचे पालकमंत्री करण्यात आले आहे. रत्नागिरीत सामंत उदय हे मंत्री असताना मुंबईतील अनिल परब यांना रत्नागिरीचे आणि सामंत यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री करण्यात आले.>सेनेचे १३, राष्ट्रवादीचे १२ आणि काँग्रेसचे ११शिवसेनेकडील जिल्हे असे - औरंगाबाद, धुळे, जळगाव, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली, उस्मानाबाद आणि अकोला.राष्ट्रवादीचे पालकमंत्री असलेले जिल्हे - अहमदनगर, बीड, बुलडाणा, गोंदिया, जालना, नाशिक, परभणी, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर. काँग्रेसकडील जिल्हे असे - अमरावती, भंडारा, चंद्रपूर, हिंगोली, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, वर्धा
जितेंद्र आव्हाडांसह सात जणांना मिळाले नाही पालकमंत्रिपद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 4:18 AM