मुंबई : एसटीत चालक पदासाठी भरती केली जात असून, या पदासाठी आतापर्यंत सात हजारपेक्षा जास्त अर्ज एसटीकडे आॅनलाइन दाखल झाले आहेत. फक्त तीन दिवसांत हे अर्ज दाखल झाल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.एसटी महामंडळात ३६ हजार चालक असून, सध्याच्या चालकांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. हे पाहता ७ हजार ८०० चालकांची भरती एसटी महामंडळाकडून केली जात आहे. १६ फेब्रुवारीपासून या भरतीला सुरुवात केली असून २४ मार्चपर्यंत आॅनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. नुसतीच चालकभरती करण्याबरोबरच यामध्ये चालक कम वाहक अशा नव्या पदाचाही समावेश आहे. लेखी परीक्षा, त्यानंतर कागदपत्र तपासणी आणि वाहन चाचणी घेतल्यानंतरच हे चालक एसटीत दाखल होतील, असे एसटीतील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
एसटी भरतीसाठी सात हजार अर्ज
By admin | Published: February 23, 2015 5:04 AM