शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
2
ठाकरेंनी सांगोल्यातून कुणाला उतरवले मैदानात?; शहाजीबापू पाटलांचे वाढले टेन्शन!
3
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची निशाणी मशाल घराघरात पोहचवा; उद्धव ठाकरेचं आवाहन
4
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; "शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबई एअरपोर्टवर.."
5
लाजवाब! Sarfaraz Khan चा लवचिक अंदाज अन् त्यानं मारलेला कडक फटका बघाच (VIDEO)
6
Yahya Sinwar Death: याह्या सिनवारनंतर हमासची कमान कोण सांभाळणार? 'हे' टॉप ५ लीडर शर्यतीत...
7
ठाकरेसेनेची सत्तारांविरोधात मोठी प्लॅनिंग; थेट भाजपा नेत्याला पक्षात घेणार,२०० गाड्या मुंबईकडे
8
“शरद पवार ४ वेळा CM, केंद्रात-राज्यात एकच सत्ता, तरी राज्याचा विकास केला नाही”: उदयनराजे
9
"आई, मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जातेय"; कुटुंबीय वाट पाहत राहिले पण मुलगी घरी आलीच नाही
10
आप नेते सत्येंद्र जैन यांना अखेर जामीन मंजूर; तब्बल 18 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर
11
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
12
Kareena Kapoor : सैफ नव्हे 'या' अभिनेत्यासाठी वेडी झाली होती करीना कपूर; बाथरूममध्ये लावलेले पोस्टर
13
“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?
14
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर काय घडलं? अक्षय कुमार-माधवनचा आगामी सिनेमा 'या' घटनेवर आधारीत
15
'वाळवा विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक'; सदाभाऊ खोतांनी उमेदवारीची केली मागणी
16
"यूपी से है, मराठी नहीं आती..."; मुंबई मेट्रोमध्ये परप्रांतीय कर्मचारी भरतीवरून वाद
17
सद्गुरुंच्या ईशा फाउंडेशनविरोधातील खटला बंद, सर्वोच्च न्यायालयाने दिली महत्त्वाची माहिती
18
आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप
19
जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...
20
अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, कसा आहे अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राईब'?

धिंड काढलेल्या तरुणावर लैंगिक शोषणाचा गुन्हा

By admin | Published: March 18, 2015 1:28 AM

वांबोरी येथे प्रेमप्रकरणातून धिंड काढलेल्या तरुणाविरुद्ध अत्याचार आणि लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा भिंगार पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

अहमदनगर : वांबोरी येथे प्रेमप्रकरणातून धिंड काढलेल्या तरुणाविरुद्ध अत्याचार आणि लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा भिंगार पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने सोमवारी रात्री भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.वांबोरी येथे प्रेमप्रकरणातून शुक्रवारी एका तरुणाची विवस्त्र जाहीर धिंड काढण्यात आली होती. मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून २७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जिल्ह्यातील माहेश्वरीसह अन्य समाज संघटनांनी ठिकठिकाणी मोर्चे काढून घटनेचा निषेध नोंदविला आहे. मात्र पीडित मुलीने सोमवारी तरुणाविरुद्ध अत्याचाराची फिर्याद दिल्याने प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.फिर्यादी मुलगी १७ वर्षांची आहे. तरुणाने तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगत तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. तसेच कुठे वाच्यता केल्यास शरीरसंबंधाची क्लिप व्हॉट्सअ‍ॅपवर टाकीन, अशी धमकी दिली. तरुणाने २१ डिसेंबर २०१४ व ६ जानेवारी २०१५ रोजी माझ्यावर अत्याचार केला. ९ मार्चला तारकपूर बसस्थानकाहून पळवून नेले. लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध ठेवल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)