अतुल कुलकर्णी -मुंबई
सिझरची पत्नी वादातीत असावी, हे तत्त्व घटनात्मक दृष्टीने वरच्या पदावर बसणा:यांना लागू पडते आणि तसे झाले नाही तर लोकांनी राज्यात ‘श्ॉडो कॅबिनेट’ बनवून भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या खात्यावर वॉच ठेवावा. या कामी आपण पुढाकार घेऊ, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी दिली आहे.
‘हवे आहेत भ्रष्टाचाराचे आरोप नसणारे मंत्री!’ असे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने दिले होते. त्याची चर्चा मंगळवारी दिवसभर विधानभवन परिसरातही होती. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा सुरू झाली़ त्यात ‘लोकमत’च्या बातमीचा संदर्भ कायम निघत होता. गेली काही वर्षे ज्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले किंवा ज्यांची कारकीर्द कायम वादग्रस्त ठरली, अशांचे चेहरे काळवंडलेले झालेले दिसले, तर पक्षांतर करून भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्यांच्या मनात मंत्रिमंडळातील समावेशावरून धाकधूक सुरू झाली आहे.
मंत्री होण्याची इच्छा मनात ठेवून विधान भवनात फडणवीस, राजीव प्रसाद रुडी, प्रकाश जावडेकर यांच्या मागेपुढे करणा:यांच्या चेह:यावर देखील ही भीती स्पष्ट दिसत होती. राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्यांना मंत्रिमंडळात घ्यायचे की नाही यावरून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
त्या पाश्र्वभूमीवर विश्वंभर चौधरी यांना विचारले असता, सामाजिक कार्यकत्र्याना आपलेसे वाटणारा मुख्यमंत्री अशी फडणवीस यांची प्रतिमा आहे. ती जपण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावरच असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीतील अनेक भ्रष्ट नेत्यांना पवित्र करुन घेण्याचे काम भाजपाने केले, मात्र जनतेने त्यांना धडा शिकवला याची चाड राखून निवड केली जावी. मावळत्या सरकारने कायम गरीब, धरणग्रस्त यांची नावे घेत स्वत:ची तुंबडी भरण्यापलिकडे काही केले नाही. ती परंपरा खंडीत करणारे मंत्री निवडून चांगला संदेश द्यावा, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या सुनीती सु. र. म्हणाल्या.
च्गैरव्यवहाराचे आरोप झालेल्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. सामाजिक कार्यकत्र्याना आपलासा वाटणारा मुख्यमंत्री अशी फडणवीसांची प्रतिमा आहे. ती जपण्याची जबाबदारी त्यांच्यावर
आहे, असे मत चौधरी यांनी
व्यक्त केले.
च्फडणवीस हे अभ्यासू, प्रामाणिक आणि रोखठोक भूमिका घेणारे म्हणून आम्ही त्यांना ओळखतो़ मात्र त्यांनी मंत्री निवडताना राज्याचे हित जपले पाहिजे. मावळत्या सरकारची भ्रष्टाचाराची परंपरा मोडून चांगला संदेश द्यावा, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या सुनिती सु. र. यांनी दिली.