सांगली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात मुंबईतील भेटीत मुख्यमंत्री बदलावर चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सांगलीत केला. शिवसेनेने नेतृत्व बदलाची मागणी पुढे केली असून, अपयशी मुख्यमंत्री बदलला तरी राज्यात सत्तांतर अटळ असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचारासाठी चव्हाण सांगलीत आले होते. त्यांनी महापालिका क्षेत्रातील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, वकील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटीलही होती.चव्हाण म्हणाले, राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा अमित शहा व उध्दव ठाकरे यांच्या मुंबईतील भेटीनंतर सेनेतून सुरु आहे. याचा अर्थ या भेटीतच मुख्यमंत्री बदलाची चर्चा झाल्याची व काही नावे यासाठी पुढे आल्याची शक्यता आहे. सरकार चालविण्यासाठी अनुकूल परिस्थिती, एकहाती निर्णय घेण्याचे अधिकार व बहुमत असतानाही देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्वात अपयशी मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे सरकारच्या शेवटच्या काळाता मुख्यमंत्री बदलला तरीही, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात परिवर्तन अटळ असल्याचे मतही चव्हाण यांनीव्यक्त केले.
'शहा-ठाकरे भेटीत मुख्यमंत्री बदलाची चर्चा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 3:51 AM