शहादा (नंदुरबार) : सोमवार व मंगळवारी झालेल्या दंगलीस जबाबदार असलेल्या नऊ आरोपींविरूद्ध मंगळवारी रात्री तिसरा गुन्हा दाखल झाला. यापूर्वी दंगलीप्रकरणी ६० आरोपींविरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.व्हॉटस् अॅपवरील आक्षेपार्ह मजकुरानंतर सोमवार व मंगळवारच्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई केली. आरोपी सल्लू, नमा, छोटू रिक्षावाला, सलीम रिक्षावाला, वसीम, इरफान रिक्षावाला, परवेझ, फरिद पठाण मोबाईलवाला, साजिद अहमद व इतर ४० ते ४५ जणांनी २ डिसेंबरला हातात लाठ्या घेवून व आरडाओरड करत पोलिसांच्या कामात अडथळा आणला. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली व सरकारी वाहनांचे नुकसान केले, असे हेड कॉन्टेबल रमेश पाटील यांनी बुधवारी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
शहादा दंगल प्रकरणी तिसरा गुन्हा दाखल
By admin | Published: December 04, 2014 2:46 AM