सिंधुदुर्ग - उद्धव ठाकरे आणि आमच्यात दरी निर्माण करण्यात ज्या दोन नेत्यांचा मोठा वाटा आहे. त्यात संजय राऊत आणि विनायक राऊतांचा हात आहे. या २ राऊतांवर माझा लई राग आहे. मी सिंधुदुर्गात प्रचाराला येणार आहे. संजय राऊत उभे राहत नाहीत अन्यथा तिथेही प्रचाराला गेलो असतो अशा शब्दात आमदार शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत आणि विनायर राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
...म्हणून ती जागा भाजपाला सोडलीअंधेरीच्या निवडणुकीत गेल्यावेळी मुरजी पटेल यांना चांगली मते पडली. ही त्यांची जमेची बाजू आहे. लटकेताई उभ्या राहिल्यानंतर मुरजी पटेल सातत्याने मला संधी द्या अशी मागणी होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा भाजपाला सोडण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी मुरजी पटेल विजयी होतील असा विश्वास वाटतो असं आमदार शहाजी पाटील म्हणाले.
मनसे-बाळासाहेब शिवसेना-भाजपा युती व्हावीमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर युतीबाबत पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शहाजी पाटील यांनी मनसे-भाजपा-बाळासाहेब शिवसेना ही युती १०० टक्के व्हावी. राज्याच्या हितासाठी ही युती होणं गरजेचे आहे असं म्हटलं.
जनतेला आमचा प्रयोग मान्यत्याचसोबत १९९५ मध्ये आमदार गणपतराव देशमुख यांचा पराभव केल्यानंतर जितकी प्रसिद्धी मिळाली नव्हती त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रसिद्धी मला गुवाहाटी येथे काय झाडी, काय डोंगार या वक्तव्याने मिळाली. ही सर्व देवाची देणगी आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणात केलेला नवा प्रयोग जनतेला मान्य आहे. अजित पवार यांनी आमचे मतदारसंघ आणि शिवसेना संपवण्याच्या कृतीने छातीवर दगड ठेवून ४०-५० आमदारांनी हा निर्णय घेतला असंही शहाजी पाटील म्हणाले. जेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तेव्हापासून राजकारणात वेगवेगळी गणिते सुरू झाली. आगामी काळात अजूनही वेगळी गणिते आणि आराखडे बघायला मिळतील असंही शहाजी पाटील यांनी सांगितले.