शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

शाहरुख खानच्या रेड चिल्लीज कंपनीचे बेकायदा हॉटेल पाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 7:59 PM

मुंबई- प्रसिद्ध अभिनेता किंग खान म्हणजेच शाहरुख खान याच्या रेड चिल्लीज या प्रोडक्शन हाऊसच्या बेकायदा हॉटेलवर मुंबई महापालिकेने आज कारवाई केली.

मुंबई- प्रसिद्ध अभिनेता किंग खान म्हणजेच शाहरुख खान याच्या रेड चिल्लीज या प्रोडक्शन हाऊसच्या बेकायदा हॉटेलवर मुंबई महापालिकेने आज कारवाई केली. गोरेगाव पश्चिम येथे स्वामी विवेकानंद मार्गावरील डीएलएच पार्क या इमारतीतील चौथ्या मजल्यावर हे हॉटेल आहे. गच्चीवरील रेस्टॉरंटला अद्याप पालिकेने मंजुरी दिलेली नाही, मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून हे हॉटेल या इमारतीच्या गच्चीवर दोन हजार चौरस फूट जागेमध्ये चालवण्यात येत होते.रेड चिल्लीज या कंपनीमार्फत शाहरुख खान व त्याची पत्नी गौरी खान चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. या कंपनीचे गोरेगाव पश्चिम येथी एस व्ही रोडवर प्रशस्त कार्यालय आहे. रेड चिल्लीज एफ एमचे कार्यालयही याच ठिकाणी आहे. येथील कर्मचाऱ्यांसाठी उपहारगृह नसल्याने हे हॉटेल बांधण्यात आले होते, असे समजते. रेड चिलीज कंपनीच्या कार्यालयातील सुमारे दोन हजार चौरस फूटांची गच्ची अनधिकृत बांधकाम करुन बंद करून हे हॉटेल चालवण्यात येत होते. हे सर्व अनधिकृत बांधकाम आज पाडण्यात आले.ही कारवाई करण्यासाठी महापालिकेचे २५ कामगार- कर्मचारी - अधिकारी यांच्यासह पालिकेच्याच अतिक्रमण निर्मूलन कारवाईसाठी असणा-या पोलीस पथकातील पोलीस कर्मचारीही घटनास्थळी कार्यरत होते. या कारवाईसाठी गॅस कटर, हातोडा यासारखी अवजारेही वापरण्यात आली, अशी माहिती पी. दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांनी दिली.

टॅग्स :Shahrukh Khanशाहरुख खान