शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

‘सर्किट बेंच’चा निर्णय न घेता शहा यांची निवृत्ती

By admin | Published: September 08, 2015 10:48 PM

संतप्त वकिलांनी मोहित शहांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा--तीन दिवस न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार उद्या ‘कोल्हापूर बंद’ची हाक

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी मंगळवारी कोल्हापुरात होणाऱ्या ‘सर्किट बेंच’बाबत निर्णय न घेता सेवानिवृत्ती घेतली. याच्या निषेधार्थ खंडपीठ कृती समितीच्यावतीने न्या. शहा यांची जिल्हा न्यायालय आवारात प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ‘मोहित शहा मुर्दाबाद’च्या घोषणा देत आज, बुधवारपासून कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील न्यायालयीन कामकाज तीन दिवस बंद ठेवून उद्या, गुरुवारी ‘कोल्हापूर बंद’ची हाक देण्यात आली. गेली ३० वर्षे कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील वकील संघटना मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी लढत आहेत. वकिलांसह पक्षकार बांधवांनी यापूर्वी मोर्चे, निदर्शने, रॅली, आदी आंदोलने केली आहेत. सलग ५५ दिवस न्यायालयीन कामकाज बंद ठेवले होते. या आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी न्यायमूर्ती शहा यांनी कृती समितीला बैठकीचे निमंत्रण देत सर्किट बेंच स्थापनेची प्रक्रिया ही नियमबद्ध पद्धतीने करावी लागणार आहे. त्यासाठी ‘काम बंद’ आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती करीत ३१ जानेवारी २०१४ पर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शासनाने सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्याबाबत ठराव संमत केला असतानाही मंजुरीमध्ये दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ १५ आॅगस्ट रोजी पक्षकारांनी जिल्हा न्यायालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाची दखल घेत न्या. शहा यांनी २१ आॅगस्ट रोजी खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाशी पणजी (गोवा) येथे चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी निवृत्तीपूर्वी निर्णय घेऊ, असे सांगितले होते. तसेच ठरावाच्या प्रती व संस्थानकाळातील खंडपीठाची माहिती मागविली होती. त्यानुसार कृती समितीने ठरावांसह संस्थानकाळातील माहिती संग्रहित करून फाईल मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार एस. एन. जोशी व जनरल रजिस्ट्रार मंगेश पाटील यांच्याकडे सादर केली होती. न्या. शहा हे आज, मंगळवारी निवृत्त होणार असल्याने त्यापूर्वी ते ‘सर्किट बेंच’ला मंजुरी देतील अशी आशा सहा जिल्ह्यांतील वकील वर्गाला लागून राहिली होती. त्यासाठी सकाळपासून वकील मुंबईतील वकिलांशी संपर्कात होते. कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांनी न्या. शहा यांचे रजिस्ट्रारशी दुपारी चारच्या सुमारास संपर्क साधला असता त्यांनी ‘सर्किट बेंच’बाबत कोणताच निर्णय झाला नसल्याचे सांगितले. यामुळे वकील वर्गात संतापाची लाट उसळली. तातडीने जिल्हा बार असोसिएशनच्या हॉलमध्ये वकिलांची बैठक घेण्यात आली. यावेळी न्या. शहा यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय वकिलांनी घेतला.आंदोलना-मध्ये कृती समिती निमंत्रक अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण, शिवाजीराव राणे, अजित मोहिते, विवेक घाटगे, प्रकाश मोरे, राजेंद्र रायकर, आदींसह वकील उपस्थित होते. (प्रतिनिधी)पोलीस पाहून निर्णयात बदल ‘सर्किट बेंच’ चा मंजुरीचा निर्णय न झाल्याने वकिलांनी अचानक एकत्र येऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. न्यायालयीन प्रशासनाने या प्रकाराची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. काही क्षणांतच पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, अमृत देशमुख, अनिल देशमुख, आर. आर. पाटील यांच्यासह शंभर पेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. वकिलांनी प्रतीकात्मक अंत्ययात्रा शिवाजी चौकात घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पोलीस फौजफाटा बाहेर उभा असल्याचे पाहून हा निर्णय मागे घेत न्यायालयाच्या आवारात अंत्ययात्रा काढली. ‘सर्किट बेंच’ बाबत निर्णय न झाल्याचे समजताच उच्च न्यालयालयाच्या खंडपीठाच्या लढ्यामध्ये गेली ३० वर्षे असलेले ज्येष्ठ वकील शिवाजीराव राणे अत्यंत भावनाविवश झाले होते.आतापर्यंत जो आम्ही ‘सर्किट बेंच’ प्रश्नी लढा उभारला त्यातून न्या. शहा यांनी आतापर्यंत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ते निवृत्तीपूर्वी मंजुरी देतील, अशी आम्हाला खात्री होती. परंतु ते आमचा अपेक्षाभंग करतील असे स्वप्नातही पाहिले नव्हते. हा लढा आम्ही अर्ध्यावर सोडणार नाही, तर शेवटपर्यंत लढणार आहोत. अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण, निमंत्रक, खंडपीठ कृती समिती ‘सर्किट बेंच’बाबत निर्णय घेण्याची क्षमता न्या. मोहित शहा यांच्याकडे नाही. त्यांनी उच्च पदावर काम केले, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. या मागणीसाठी काडी पेटली आहे, आता ती पेटत राहणार. - अ‍ॅड. विवेक घाटगे, माजी अध्यक्ष पुतळ्याऐवजी अंत्ययात्रा ‘सर्किट बेंच’ला न्या. शहा यांनी मान्यता दिल्यास त्यांचा कोल्हापुरात पुतळा उभा करण्याचा निर्णय सर्वपक्षीय खंडपीठ कृती समितीच्या मेळाव्यात घेण्यात आला होता. यावेळी महापालिकेने त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही घेतली होती; परंतु निर्णय न घेता निवृत्ती घेतलेल्या न्या. शहा यांची न्यायालय आवारात २०० पेक्षा जास्त वकिलांनी एकत्र येऊन प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. त्यानंतर तिरडीचे साहित्य पेटवून देत शंखध्वनी केला. यावेळी ‘मोहित शहा मुर्दाबाद’च्या घोषणा देत निषेध व्यक्त केला. आज सर्वपक्षीय बैठक न्या. शहा यांनी निर्णय न घेता निवृत्ती घेतली. याच्या निषेधार्थ आज, बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता न्यायालयाच्या आवारात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीत गुरुवारी ‘कोल्हापूर बंद’ची हाक देण्यात येणार आहे. त्यानुसार बंददिवशी शहरात सर्वत्र रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये १५ हजार महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. फुल्ल हाऊसच्या बैठकीसमोर फाईल न्या. शहा यांनी मंगळवारी दुपारी फुल्ल हाऊसच्या बैठकीत ‘र्स्किट बेंच’ची फाईल ठेवली. उपस्थित उच्च न्यायालयाचे ४५, औरंगाबाद व नागपूर खंडपीठाचे २० अशा ६५ न्यायाधीशांना या मागणीसंदर्भात आपले मत देऊन नवीन रुजू होणाऱ्या मुख्य न्यायाधीशांसमोर ही फाईल ठेवावी, असे त्यांनी मत व्यक्त केल्याचे वकिलांनी पत्रकारांना सांगितले. न्यायाधीशांची चर्चा वकिलांनी न्यायालय आवारात आंदोलन केल्याने पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांची त्यांच्या चेंबरमध्ये चर्चा केली.