कोल्हापूरमधून शाहू छत्रपती, सोलापूरमधून प्रणिती शिंदे तर..., काँग्रेसकडून महाराष्ट्रातील ७ उमेदवारांची यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 09:34 PM2024-03-21T21:34:25+5:302024-03-21T21:48:12+5:30
Congress Candidates List Maharashtra: काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आज प्रसिद्ध केलेल्या देशभरातील ५८ उमेदवारांच्या यादीमध्ये महाराष्ट्रामधील ७ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमधील जागावाटप अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेलं नाही. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आज प्रसिद्ध केलेल्या देशभरातील ५८ उमेदवारांच्या यादीमध्ये महाराष्ट्रामधील ७ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांना तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये काँग्रेसला मिळणाऱ्या संभाव्य जागांवरील उमेदवारांची घोषणा काँग्रेसकडून आज करण्यात आली आहे. यात नंदूरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर, सोलापूर, आणि कोल्हापूर या मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेसचे आज उमेदवारी केलेल्या ७ लोकसभा मतदारसंघांचं वैशिष्ट्य म्हणजे यातील चार मतदारसंघ हे आरक्षित आहेत. यामध्ये काँग्रेसने नंदूरबारमधून जी. के. पाडवी, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, पुण्यामधून रवींद्र धंगेकर, लातूरमधून शिवाजीराव काळगे, सोलापूरमधून प्रणिती शिंदे आणि कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित 'केंद्रीय चुनाव समिति' की बैठक में लोकसभा चुनाव, 2024 के लिए 57 लोकसभा सीटों पर कांग्रेस उम्मीदवारों के नाम की तीसरी लिस्ट जारी की गई। pic.twitter.com/7TMkx4faZ4
— Congress (@INCIndia) March 21, 2024
या यादीमुळे काही मतदारसंघातील प्रमुख लढतींचं चित्र स्षष्ट झालं आहे. त्यामध्ये नंदूरबारमध्ये भाजपाच्या हीना गावित विरुद्ध काँग्रेसचे जी. के. पाडवी यांच्यात लढत होईल. तर पुण्यामध्ये भाजपाचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर यांच्यात मुख्य लढत होईल. तर नांदेडमध्ये भाजपाचे प्रतापवार चिखलीकर यांच्याविरुद्ध वसंतरावर चव्हाण यांच्यात मुख्य लढत होईल.