शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

शेगावात उसळला भक्तीसागर !

By admin | Published: February 19, 2017 2:17 AM

‘श्रीं’ चा १३९ वा प्रकटदिन महोत्सव; १हजार ३५६ भजनी दिंड्याचा सहभाग.

गजानन कलोरे शेगाव, दि. १८- 'गजानना अवलीया, अवतरले जग ताराया', 'गण गण गणात बोते' च्या गजरात शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचा १३९ वा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संतनगरी शेगावात भाविकांचा भक्तिसागर उसळला होता.शनिवार माघ वद्य-सप्तमी अर्थात १८ फेब्रुवारी रोजी सकाळपासून श्रींच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. अत्यंत शिस्तीत भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. हभप विष्णु महाराज कव्हळेकर यांचे सकाळी कीर्तन झाले. दुपारी १२ वाजता गुलाबपुष्प गुलाल उधळून श्रींचा प्रकट सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील, अध्यक्ष डॉ. रमेशचंद्र डांगरा, विश्‍वस्त निळकंठदादा पाटील, नारायणराव पाटील, गोविंद कलोरे, अशोक देशमुख, पंकज शितूत, किशोर टांक आदि मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी महारुद्रस्वाहाकार यज्ञाची पुर्णाहूती संपन्न झाली. या उत्सवात २३ ते २९ फेब्रुवारी दरम्यान १ हजार ३५६ भजनी दिंड्यांचे आगमन झाले होते. यामध्ये २५८ नवीन तर ९९९ जुन्या दिंड्या सहभागी झाल्या होत्या. भजनी दिंड्याची वारकरी संख्या ३१ हजारावर होती. संस्थानच्यावतीने २ लाखावर भक्तांना महाप्रसाद वितरण करण्यात आले. नागपूर टिमकी श्रीभक्त मंडळाच्या वतीने वारकर्‍यांचे पादत्राणे विनामुल्य ठेवण्याची व्यवस्था केली आहे. रविवार १९ फेब्रुवारीला सकाळी ७ ते ८ दरम्यान हभप जगन्नाथ मस्के मुंबई यांचे काल्याचे किर्तन होऊन यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे.श्रींची भव्य नगर परिक्रमाप्रकटदिनी श्रींच्या पालखीची दुपारी २ वाजता रथ, मेणा, गज अश्‍वासह नगर परिक्रमा काढण्यात आली. श्रींची पालखी दत्तमंदिर, हरहर शिवमंदीर श्री शितलनाथ महाराज मंदिर, फुलेनगर श्रींचे पकटस्थळ, श्री मारोती मंदीर बाजार विभाग, बसस्थानक व्यापारपेठ मार्गे श्रींची पालखी काढण्यात आली. शिवमंदीर, श्री प्रकटस्थळ, श्री मारोती मंदीर येथे विश्‍वतांच्या हस्ते पुजा करण्यात आली. लिप्ते, किशोर टांक यांच्या वतीने वारकर्‍यांना चहा व अभियांत्रिकी कर्मचारी विद्यार्थ्यांंच्या वतीने शरबत देण्यात आले. फुलवाले गोमासे यांनी श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली.