शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

रविवर्म्याच्या शकुन्तलेच्या नाकात नथ नाही हे तिचं भाग्यच!

By admin | Published: January 19, 2016 8:31 PM

पुरातन काळापासून कर्णभूषणं, नासिकाभूषणं, कंठभूषणं, अंगुलिभूषणं, हस्तभूषणं, बाहुभूषणं, कटिभूषणं आदि वापरण्याची प्रथा होती.

२१व्या शतकाचा उंबरठा ओलांडण्याच्या संक्रमणावस्थेत साक्षेपी संपादक या नात्याने लोकमत परिवाराचा भाग बनलेल्या अरूण टिकेकरांचे १९ जानेवारी २०१६ रोजी निधन झाले. टिकेकरांनी लोकमतमध्ये लिहिलेले निवडक लेख.

टिकेकरांनी लोकमतच्या मंथन पुरवणीत १७ जुलै २०११ मध्ये लिहिलेला खालील लेख.

 

रविवर्म्याच्या  शकुन्तलेच्या नाकात नथ नाही हे तिचं भाग्यच!

पुरातन काळापासून कर्णभूषणं,
नासिकाभूषणं, कंठभूषणं,
अंगुलिभूषणं, हस्तभूषणं, बाहुभूषणं,
कटिभूषणं आदि वापरण्याची प्रथा
होती. ऐपतीप्रमाणो त्या
आभूषणांसाठी सोनं-रुपं, मोती-
माणकं वापरली जात. त्यात आपलं
असलेलं सौंदर्य खुलवण्याचा
हेतू असे. हे स्पष्टीकरण
मान्य होण्यासारखं आहे; पण
इतिहासाच्या असामान्य
भाष्यकाराला या अलंकारआ
भूषणात काय अर्थ दिसला,
याचंही एक उदाहरण देण्यासारखं
आहे. दामोदर धर्मानंद कोसांबी यांचं
‘एक्ङॉस्परेटिंग एस्से नावाचं जे एक
छोटेखानी पुस्तक आहे, त्यात आपल्या
देशात बुद्धवादाचा :हास कसा व का
झाला, याची मीमांसा केलेला एक निबंध
आहे. अजिंठा-वेलोर येथील
भित्तिचित्रंमध्ये ज्या व्यक्ती दाखवल्या
आहेत, त्यांच्या अंगावर भरपूर दागिने
दिसतात. दागिने कसे येतात, तर ते
मिळालेल्या व मिळवलेल्या अतिरिक्त
पैशातून संग्रहित होतात. म्हणजे बौद्ध
राज्यकर्ते जे सांगत असत आणि प्रत्यक्ष
आचरण करत असत, त्यात तफावत होती.
विचार-आचारांच्या या तफावतीमुळे
बौद्धधर्मावरील जनतेची श्रद्धा ढासळली.
अशी मीमांसा कोसंबींनी केली आहे.
अर्थात, दागिन्यांचा सोस हा मनुष्य
स्वभाव आहे, हे नाकारता येत नाही. आज
कल्पकतेनं घडवलेल्या आगळ्या वेगळ्या
दागिन्यांची चलती आहे. असे वेगळेपणानं
उठून दिसणारे दाग-दागिनेच सर्वाधिक
महाग असतात. पण कितीही झालं, तरी
अलंकार वापरण्याची शरीराची अंगं
वाढवता येत नाही, म्हणजे त्यांचे प्रकार
वाढले, तरी त्यांची वर्गवारी फारशी बदलत
नाही. दागिन्यांत पूर्वी जी संख्या वाढ
झाली, तीच आणि तेवढीच. एक मात्र
सांगता येईल, बहुतेक दागिन्याला इतिहास
आहे. त्याच्याभोवती आख्यायिका
गुंफलेल्या प्रत्येक संस्कृतीत आहेत. काही
दागिन्यांना तर जागतिक इतिहास आहे.
हाताच्या बोटावर घालण्याच्या अंगठीचंच
उदाहरण घेता येईल. अंगठी ही
अलंकारात मोडते खरी; पण तिचे इतरही
उपयोग केले गेले. एखाद्या ऐतिहासिक
कागदाचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी
तिच्यावरील आत्मविशिष्ट चिन्ह अथवा
मुद्रा उठवली जाई. अंगठीमागे
संरक्षणाचीही कल्पना असे. मंतरलेली
अंगठी (विशिष्ट रत्न कोंदणात
बसवलेली) अरिष्टांपासून संरक्षण करते,
अशी अनेकांची श्रद्धा आहे. स्मृती म्हणून,
शपथ म्हणून अंगठीचा उपयोग केला
गेला. इजिप्तमध्ये ही पद्धत सुरू झाली,
असं म्हणतात. वधू-वराच्या
वा्निश्चयाच्या प्रसंगी अंगठीची
देवाणघेवाण प्राचीन काळापासून केली
गेली. सुवर्णाची अंगठी एकमेकाला देणं हे
मात्र इ. स. दुस:या शतकापासून सुरू
झालं. अशा किती तरी बाबी सांगता
येतील. अहो, सीतामाईची भेट झाल्यास
रामाचा दूत म्हणून ओळख पटवण्यासाठी
हनुमानाकडे रामानं आपली अंगठीच दिली
ना? अभिज्ञानशाकुंतलम् हे अख्खं नाटक
कालिदासानं खुणोच्या अंगठीवरच बेतलं
ना?
संस्कृत वा्मयात नायिकेच्या
आपादमस्तक ल्यालेल्या अलंकारांचं
वर्णन करण्यात कवींची अहमहमिका
लागलेली दिसते. पण गंमत अशी की,
एकाही नासिकालंकाराचा त्यात उल्लेख
नाही. यावरून ‘संस्कृतिकोश’कारांनी
प्राचीन काळी नाकात अलंकार घालण्याची
प्रथा नसावी, असं अनुमान काढलं आहे.
लवंग, लोलक, चमकी, मोरणी, फार काय,
खास मराठमोळी म्हणून नावाजलेली नथ
हे सारे नासिकालंकार मुस्लीम राजवटीत
आले, असा तर्क केला आहे. अरब स्त्रिया
नाकात नथवजा वलय घालतात. पंजाबी
स्त्रियाही नाकात सोन्याच्या तारेचे वलय
घालतात. एवढंच नव्हे, तर दक्षिण भारतीय
स्त्रिया तीन प्रकारचे नासिकालंकार
घालतात - मुक्कुकुट्टी, बुलक आणि नत्तू.
मुक्कुकुट्टी अथवा मूकुट्टी, मुकुथी हा
सौभाग्यालंकार मानला गेला आपल्या
नथेसारखा.
डॉ. प. कृ. गोडे यांनी तर नथ या
नासिकालंकाराचा साकल्यानं अभ्यास
करून, अन्य संशोधकांशी चर्चा करून,
आपल्या चार शोधनिबंधांद्वारे आपल्या
महिलावर्गात गेल्या शतकात प्रामुख्यानं
प्रिय झालेली नथ हा अलंकार हिंदू
धर्मसंस्कृती संमत नाही, हे सिद्धच केलं
आहे. नथीचा सौभाग्यालंकार म्हणून अन्य
दागिन्यांत समावेश होऊ नये, तिचा त्याग
केला जावा, अशी शिफारस केली आहे.
इ. स. 1क्क्क् च्या पूर्वीच्या आपल्या
दागिन्यांत या नासिकालंकाराचा समावेश
नाही. नथ हा प्रकार इजिप्तच्या रानटी
टोळ्यांकडून अरबी लोकांकडे गेला.
‘बायबल’च्या ओल्ड टेस्टॅमेंटमध्ये
कर्णालंकार आणि नासिकालंकार या
दोन्हींचे तुरळक उल्लेख येतात. काहीही
असलं, तरी हिंदुस्थानच्या
कानाकोप:यातील वेगवेगळ्या संस्कृतीत
नासिकालंकाराचं अस्तित्व हे गेल्या हजार
वर्षाचंच आहे. इ. स. 1000 नंतरच्या
नंतरच नासिकालंकार इथं अवतरला.
संस्कृतमध्ये इतके अलंकार सांगितले
आहेत की, आश्चर्य वाटावं. पण त्यात
नासिकालंकाराचा किंवा नथीचा
उल्लेखही नाही. नंतरच्या संस्कृत कवींनी
‘नासामौक्तिक’, ‘नासाग्रमुक्ताफल’,
‘नासमणी’ वगैरे शब्द तयार करून
वापरलेले आढळतात.
‘सुभिषितरत्नभांडागार’मध्ये
‘नासभूषणा’बद्दल ज्या काव्यपंक्ती आहेत,
त्याचाही समावेश नंतरचा असल्याचं डॉ.
गोडे यांनी नमूद केलं आहे.
म्हणजे नथीच्या बाबतीतही
बटाटय़ासारखा प्रकार झाला. बटाटा जसा
अन्य देशातून आला आणि उपवासालाही
चालू लागला, तसा नासिकालंकार
देशाबाहेरून आला आणि हिंदू धर्मशास्त्रसं
मत नसतानाही इथल्या स्त्रियांचा
सौभाग्यालंकार झाला.
डॉ. गोडे यांनी पुणो नगरपालिकेचे
आरोग्याधिकारी असलेल्या डॉ. केरशॉ
दिनशॉ खंबाटा यांनी विसाव्या शतकाच्या
सुरुवातीला काढलेल्या एका फतव्याची
आठवण दिली आहे. नथ हा अलंकार
पुण्यात फारच प्रचलित होता. त्यावेळी डॉ.
खंबाटांनी नथ घालण्याविरुद्ध चळवळ
सुरू केली होती. त्यांचं म्हणणं असं होतं
की, स्त्रियांनी नथ घालणं सोडून द्यावं.
कारण नथीमुळे स्त्रीची नासिका अस्वच्छ
राहते आणि ती नथ त्या स्त्रीच्या
आरोग्याला बाधा आणते ! त्यांचं म्हणणं
तत्कालीन किती पुणोकर महिलांनी मानलं,
हे कळायला मार्ग नाही. डॉ. गोडे यांनी नथ
वापरणं स्त्रियांनी सोडून द्यावं, असं
वाटलं. पण डॉ. गोडे यांचं कारण ती
धर्मशास्त्र संमत नाही हे होतं. विसाव्या
शतकात तरी मराठी महिलांनी ‘नथ’ हा
सौभाग्यालंकार’ मानला. पण या
स्त्रियांमध्ये शिक्षण-प्रसार झाल्यानंतर
तथाकथित सौभाग्यालंकार हे या
महिलांना अनावश्यक जोखड वाटू
लागले, तेव्हापासून नथ वापरणं हळूहळू
बंद झालं. क्वचित कोठे नथीची
नव:याकडून मागणी होते, क्वचित
विशेषप्रसंगी ती नाकावर टिच्चून बसवली
जाते; पण अन्यथा दागिन्यांच्या पेटीत
निपचित पडून असते. आधुनिक स्त्रिया
तर नथीकडे ढुंकूनही पाहत नाहीत किंवा
तिची मागणीही करत नाहीत. हा
नासिकालंकार विस्मृतीत जाण्याच्या
मार्गावर आहे. एक काळ असा होता की,
नथीचा तोरा होता. एडवर्ड मूरच्या
शब्दांतच वर्णन वाचा -
In Common with most other
Hindoos, the women wear an
ornamental ring or jewel in their
nose, called in Hindvi (=Marathi?)
nutt. A great deal of money in
sometimes expended, and a great
deal of taste sometimes displayed,
in the execution and design of this
favourite appendage, which
whatever mere Europeans think,
must be allowed a very becoming,
and almost irresistible addition to
the nose of a pretty face.
नथीमुळे स्त्रीचं सौंदर्य खुलतं, असं
एडवर्ड मूरलाही वाटलं, मग त्या नथ
वापरणा:या खुद्द स्त्रीला का वाटलं
नसणार?
पण नथीला धर्मशास्त्रची संमती
नाही. ती परकीय संस्कृतीतील ! नथीला
विरोध करणारा एक अस्सल पुरावा
संशोधक डॉ. नी. त्र्यं. पुंडे यांनी दिला.
सोलापूरला डिस्ट्रिक्ट जज असलेल्या
सत्येंद्रनाथ टागोर (कविवर्य रवींद्रनाथांचे
वडील बंधू) यांच्या स्वर्णकुमारी कन्येचे
काही लेख सोलापूरच्याच कल्पतरूव
आनंदवृत्त या साप्ताहिकात प्रसिद्ध झाले
होते. त्यापैकी एका लेखात तिनं नथीबद्दल
जे मत मांडलं आहे, ते वाचून त्यावेळच्या
सुशिक्षित महिलांनी हा नासिकालंकार
आपल्या दागिन्यांच्या पेटीच्या तळालाच
ठेवला असणार. ती म्हणते - ‘पुरुषांना
काय व बायकांना काय, या देशात
(प्रदेशात? दख्खनप्रांती?) फुलांची हौस
फार आहे असे दिसते. वेणीवर फुलांचा
गजरा घालणो, हा बायकांच्या लेण्याचा
एकभाग आहे. तरी नाकात मोत्यांच्या त्या
विलक्षण मोठमोठय़ा नथा (नथी?) व
डोक्यावर पुढल्या बाजूस केस जाऊन
पडलेल्या टकलावर ती सोन्याची अद्भुत
चक्रे, मागच्या बाजूस तो वेणीचा खोपा
आणि तो फुलांचा गजरा म्हणजे आमच्या
दृष्टीला अगदीच बिजोड दिसते.
वास्तविक पुष्कळदा आमच्या मनात येते
की, या देशचे भादरलेल्या डोक्याचे पुरुष
आणि नथेने बेडौल केलेल्या व ताणून
बांधलेल्या स्त्रिया परस्परांच्या मुखाकडे
पाहून मोहित होऊन मनात म्हणत
असतील, ‘पाहू, पाहू आणखी एकदा पाहू.
किती पाहिले तरी पाहावेच वाटते !’..
चित्रकार राजा रविवम्र्याच्या चित्रतील
शकुंतलेच्या नाकात ‘महाराष्ट्री
युवतीची नथ’ नाही हे तिचं मोठं भाग्य,
असाही टोमणा स्वर्णकुमारीनं मारला
आहे. ती पुढं म्हणते -
‘मुंबई शहरात एक जातीच्या बनिया
लोकांनी स्त्रियांची नथ काढून टाकण्याचा
बेत केला आहे.. या पुढे जी कोणी नथ
घालील तिला 1क् रु. वर 4 आणो दंड
द्यावा लागेल.. आता स्त्रियांनी पंचायत
करून पुरुषाच्या डोक्याचा बोडकेपणा
काढून टाकल्यास ठीक होईल.. स्त्रियांना
नथ घालण्याला विष्णूने आज्ञा दिली,
असा येथल्या सर्वाचा विश्वास आहे. जणू
काय, सत्ययुगातल्या सुदर्शन-चक्राने या
युगात स्त्रियांच्या नथेचे रूप धारण केले
आहे ! त्यांचा पक्का भरवसा आहे, की
तिच्या जोराने पुरुषाचे हृदय आतल्या
आत छिन्न करून जिंकता येईल. हा त्यांचा
भरवसा अगदी चुकीचा आहे, असे समजू
नका. हल्ली पुण्यास एक फॅन्सी ड्रेस
बॉलडान्स (विचित्र पोषाखाचा नाच)
होणार आहे. आम्ही जाऊ म्हणतो. मला
वाटले की, आपण या देशची राणी बनावे.
म्हणून येथल्या एका गृहस्थाला काही
दागिने जमा करून देण्यास सांगितले. तो
म्हणाला, राणी होण्याला नाकात मोठाल्या
मोत्यांची नथ व पायात जडशीळ
साखळ्या घालाव्या लागतील. ते ऐकताच
मला वाटले मला राणी होण्याची जरूर
नाही. मी आहे ती बेब आहे. हा गृहस्थ
सुशिक्षित व सुरुचि आहे. बंग देशाला
गेला होता. बंगाली भाषा जाणतो व बंगाली
लोकांची बुद्धी व रुचीची तारीफ करतो.
याला नथ कशी दिसते म्हणून एकदिवस
आम्ही विचारले. आम्हाला खचीत वाटले
की, अगदी वाईट असे तो म्हणोल. परंतु
त्याने उत्तर दिले- ‘वाईट दिसत नाही.
पण नाकात नथ नसली तर चेहरा बुच्च
बुच्चा दिसतो.’ मला तर वाटते की, मी
पुरुष असते आणि शुभदृष्टीच्या वेळी
(वधू जेव्हा वराच्या प्रथम दृष्टी पडते
तेव्हा- विवाहसंस्कारात शुभदृष्टी हा एक
भाग आहे) असले नथ घातलेले मुख
माङया दृष्टी पडते, तर तत्काळ त्या
स्वस्तिक काढलेल्या पाटावरून उडी
मारून मी पळून गेले असते !’’
17 जानेवारी 1892 मध्ये प्रसिद्ध
झालेल्या या लेखावर भाष्य करण्याची
गरज आहे?