- सुनील भांडवलकर
कोरेगाव भीमा, दि. २७ - छत्रपती शंभूराजांचे चरित्र ज्याप्रमाने दुर्लक्षित राहिले त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजीमहाराजांचे समाधिस्थळ हे लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिले आहे. आजही समाधिस्थळ तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ ह्यकह्ण वर्गामध्ये असून, शासनाने ते ह्यअह्ण किंवा ह्यबह्ण वर्गात समावेश केला, तर पर्यटन विकास महामंडळाच्या निधीतून समाधिस्थळाचा विकास होणे शक्य होईल.संभाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांची समाधी राणी सईबाई व शाहू महाराजांनी शोधून काढली. दगडी समाधी बनविण्यात आली. परंतु इंग्रजी राजवटीत पुन्हा समाधी दुर्लक्षित झाली. त्यानंतर इतिहासकार कै. वा. सी. बेंद्रे यांनी समाधी शोधून काढल्यानंतर समाधीचे बांधकाम करण्यात आले. ३ मे १९७६ रोजी महाराष्ट्रातील शंभुभक्तांचे आराध्य दैवत शंभू छत्रपतींचा जगातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते व १७ डिसेंबर १९६७ साली पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते व कामगार व पुनर्वसन मंत्री शंकरराव पाटील, दत्तो वामन पोतदार, प्रा. शिवाजीराव भोसले, बाप्पुसाहेब थिटे, गो. ना. वाघ यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे बसवण्यात आला.वढू बुद्रुक ग्रामपंचायत, धर्मवीर संभाजीमहाराज स्मृती समिती यांच्या माध्यमातून समाधिस्थळाचा विकास होत आहे. त्यातच आता आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या आमदार ह्यआदर्शग्रामह्णमध्ये सहभागी झाल्याने या स्थळाचा विकास झपाट्याने होण्यास मदत होणार आहे.समाधिस्थळ व बलिदान स्थळास जोडणार पूल गरजेचा...छत्रपती संभाजीमहाराजांच्या समाधिस्थळावर शंभूशिल्पसृष्टी, गार्डन, पार्किंग व्यवस्थेबरोबरच समाधिस्थळ वढू बुद्रुक व बलिदान स्थळ तुळापूर ही दोन्ही ठिकाणे शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली असल्याने वढू-तुळापूर यांना जोडणाऱ्या पुलाची मागणी शंभूभक्त व वारकऱ्यांची आहे. या पुलाबाबत तत्कालीन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनीही हिरवा कंदील दाखविला होता. शिवरायांप्रमाणे अद्वितीय स्मारक उभारणार...शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक अरबी समुद्रात उभे राहणार आहे. त्याच धर्तीवर छत्रपती संभाजीमहाराजांचे राष्ट्रीय स्मारक वढू तुळापूरमध्ये उभारण्याचा संकल्प करतानाच यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तो आराखडा शासनास सादर करण्यात येऊन संभाजीराजांचे अद्वितीय स्मारक उभारणार असल्याचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले.समाधिस्थळाची सुरक्षा रामभरोसे...छत्रपती संभाजीमहाराज समाधिस्थळावर सीसीटीव्ही यंत्रणा व कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नाही. त्यामुळे येथील सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. समाधिस्थळावर सुरक्षारक्षक किंवा पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. या ठिकाणी खासगी कारखान्यांमार्फत सुरक्षारक्षक ठेवण्याची तयारी दर्शवली होती. परंतु त्यावर अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी औद्योगिक कारखान्यांची पुन्हा बैठक घेऊन याठिकाणी सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही बसवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.