शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!
2
लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
3
Team India Arrival LIVE: मुंबईकरांचे स्पिरीट! प्रचंड गर्दीतही अँम्ब्युलन्सला करून दिली वाट
4
“शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात मविआ सरकार अन् राष्ट्रवादी...”; रोहित पाटलांचे सूचक विधान
5
हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री, तुरुंगातून सुटल्यानंतर घेतली CM पदाची शपथ
6
"...तर आपण सर्व नामशेष होऊ"! इस्रो प्रमुख सोमनाथ यांचा पृथ्वीवासीयांना मोठा इशारा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला जाणार, परराष्ट्र मंत्रालयाने तारीख सांगितली
8
"गुजरातच्या बसला पार्किंगसाठी जागा देऊ, पण भारतीय संघाची 'बेस्ट' मधूनच मिरवणूक काढा"
9
Jio आणि Airtel नंतर आता Vi चे प्लॅन महागले; जाणून घ्या नवीन किमती...
10
Victory Parade : Team India च्या विमानाला असाही 'सॅल्युट'! अनोख्या घटनेने वेधले सर्वांचे लक्ष
11
टोमॅटो पुन्हा २०० पार जाण्याची शक्यता; मुंबई, देशभरातील आत्ताचे दर काय...
12
विश्वविजेत्या टीम इंडियाला भेटल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली युझवेंद्र चहलची खास विचारणा, म्हणाले, ‘’हाच का तो…’’
13
राहुल गांधींनी हाती घेतले फावडे अन् कामगारांसोबत थापीही फिरवली!
14
इंडिया का राजा, रोहित शर्मा...! वानखेडेवर हिटमॅनचा जलवा; चाहत्यांचा एकच जल्लोष, Video
15
'T20 वर्ल्ड चॅम्पियन्स'च्या कुटुंबीयांना भेटले PM मोदी; BCCIकडून पंतप्रधानांना स्पेशल 'जर्सी'!
16
ब्रिटनमध्ये ऋषी सुनक दारुण पराभवाच्या छायेत? सर्व्हे आला, आज मतदानाला सुरुवात
17
“कंपन्यांकडून लूट, पीकविम्याचे धोरण बदलून शेतकरी हिताचे करा, शिंदे सरकार...”: नाना पटोले
18
धीरेंद्र शास्त्रींचा जन्मोत्सव; शुभेच्छा देण्यासाठी बागेश्वर धाममध्ये लाखो भाविकांची गर्दी
19
अंबादास दानवेंना दिलासा, उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाबाबत महत्त्वाचा निर्णय
20
सेन्सेक्स पहिल्यांदा 80,000 पार; BSE मार्केट कॅप 447.43 लाख कोटींच्या पुढे...

मनोज जरांगेंना आवश्यकता भासल्यास अधिकची सुरक्षा दिली जाईल - शंभूराज देसाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 4:01 PM

Shambhuraj Desai : मनोज जरांगे-पाटील यांना संरक्षण द्या, ड्रोन कोण फिरवते आहे, याचे सविस्तर निवेदन सरकारने करण्याची सूचना विजय वडेट्टीवार यांनी केली होती. 

मुंबई  : अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या घराजवळ ड्रोन फिरत आहेत. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु आंदोलन हाताळण्याची ही कुठली पद्धत आहे असा सवाल करत मनोज जरांगे यांच्या जिवाला धोका असून याबाबत चौकशी केली जावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. यावर बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत चौकशी करून अहवाल मागवला जाईल आणि मनोज जरांगे यांना योग्य सुरक्षा दिली जाईल, अशी ग्वाही दिली. 

मंगळवारी विधानसभेत शंभुराज देसाई यांनी सांगितले की, यासंदर्भात जालना पोलीस अधीक्षकांकडून संबंधित पोलीस ठाण्याकडून अहवाल मागवला जाईल. तसेच, ड्रोनद्वारे कोण टेहळणी करीत आहे, याची चौकशी केली जाईल. मनोज जरांगे पाटील यांना यापूर्वीच सुरक्षा देण्यात आली आहे. याशिवाय, आवश्यकता भासल्यास अधिकची सुरक्षा दिली जाईल, असेही शंभुराज देसाई यांनी सांगितले.

दरम्यान, अंतरवली सराटी या गावावर ड्रोनने टेहळणी केल्याचे वृत्त आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेला धोका आहे. टेहाळणी प्रकार होत असेल तर कोण करते, कशामुळे टेहळणी केली जात आहे? आंदोलन करणे प्रत्येकाचा अधिकार आहे. हा अधिकार संविधानाने दिला आहे. अंतरवाली सराटीतील रहिवाशी भयभीत झाले आहेत. याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे. मनोज जरांगे-पाटील यांना संरक्षण द्या, ड्रोन कोण फिरवते आहे, याचे सविस्तर निवेदन सरकारने करण्याची सूचना विजय वडेट्टीवार यांनी केली होती. 

आम्ही मेल्यावर तुम्ही एकत्र येणार का? मनोज जरांगेंचा सवालदरम्यान, मनोज जरांगे ओबीसीतून मराठा आरक्षण, सगेसोयरेची अंमलबजावणी यावर ठाम आहेत. आज पत्रकारांशी बोलताना मराठा आमदारांनी एकत्र यायला हवे. आम्ही गेल्यावर तुम्ही एकत्र येणार का, असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी केला. ते म्हणाले, ६ जुलै ते १३ जुलै शांतता रॅलीत सर्वांनी एकत्र यावे. आता हीच वेळ आहे. मराठ्यांना चारी बाजूने घेरलेले आहे. मराठा आमदारांनी आता एकत्र यावे आणि अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलावे. ते अधिवेशनात मराठा आरक्षणाची मागणी करतील, असे वाटत आहे. आता मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्र यावे. आम्ही मेल्यावर तुम्ही एकत्र येणार का, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे. 

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMaratha Reservationमराठा आरक्षण