ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.,13 - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना यांच्यातील तुटलेली युती आणि दोघांकडूनही एकमेकांवर होत असलेल्या तुफान आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यात मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले आहेत.
आज रात्री केलेल्या ट्विटमध्ये शरद पवार म्हणाले, अडीच वर्षांतच निवडणुका आल्यास महाराष्ट्राचं फार काही नुकसान होणार नाही. २३ तारखेनंतर तशी परिस्थिती उद्भवलीच तर मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे., शरद पवार यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
२३ तारखेनंतर तशी परिस्थिती उद्भवलीच तर मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे.(२/२) pic.twitter.com/SJz49fQjXD— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 13, 2017