सोलापूर : सरकार बदलले मात्र धोरण बदलले नाही़ त्यामुळे शेतकºयांच्या आत्महत्येची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़ शेती उद्योगातील क्रांतीचे श्रेय घेणाºया शरद पवारांनी शेतकºयांच्या आत्महत्यांचीही जबाबदारीही स्वीकारावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली.
१५ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे कै़ बबनराव काळे याच्या स्मरणार्थ शेतकरी संघटनेची कार्यकारणी व्यापक स्वरूपाची करण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे़ या मेळाव्याची माहिती सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांना देण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील सोलापुरात आले होते़ त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ पुढे बोलताना रघुनाथ पाटील म्हणाले की, सरकार तेच आहे मात्र नाव बदलले आहे़ राज्य सरकारमधील नाव बदलली आहेत. बाकीचे सर्वकाही तसेच आहे. शेतकरी बदलली जात आहेत, धोरणे मात्र तीच कायम आहेत. पंडीत नेहरूंनी जी शेतकरी विरोधी भूमिका घेतली, तोच वारसा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे चालवित आहेत.
शरद पवार जाणते राजे आहेत. पन्नास वर्षे राजकारणात आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरूवातीची पंधरा वीस वर्षे शेतकºयांच्या आत्महत्या नव्हत्या. गेल्या ४० वर्षात पवार राजकारणात आले, तसे शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रकार वाढले. विकासकामांचा मोठेपणा ते जसे घेतायेत, आम्ही मोठेपणा द्यायला तयार आहोत. महाराष्ट्रातील शेतकºयांच्या समस्या सोडविण्यात त्यांना अपयश आले आहे. शेतकºयांच्या आत्महत्येचे पाप हे त्यांचेच आहे, असेही पाटील म्हणाले.
महाराष्ट्रातील पाण्याचे योग्य नियोजन झाले तर महाराष्ट्रासह जवळच्या राजातील पाण्याचे प्रश्न सुटणार आहेत.शेतकरी विरोधी कायदा केंद्र सरकारने बदलला पाहिजे. शेतकरी सुखी तर देश सुखी हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे. मोदी सरकारने समस्या सोडविण्याऐवजी वाढविल्या आहेत. शेतकरी संकटात असताना आपला देश महासत्ता कसा होणार. केवळ निवडून आलेले लोक ठरवतील तेच धोरण हे शेतकरी संघटनेस अमान्य असल्याचेही पाटील यांनी सांगितले़