शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
3
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
4
Adani Group Stocks: आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स आजही गडगडले; 'या' कंपनीला सर्वाधिक फटका
5
कोहलीचा 'विराट' संघर्ष कायम! हेजलवूडच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर 'किंग'ची झाली 'शेळी'
6
सामान्यांना महागाईचा चटका! गॅस कंपनीकडून वाईट बातमी; CNG च्या दरात इतक्या रुपयांची भाववाढ
7
Baba Siddiqui : फोन इंटरनेटचा वापर न करता कसा रचला कट?; बाबा सिद्दिकी हत्येतील आरोपीचं रहस्य उघड
8
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
9
'महागाईविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही' डिसेंबरमध्ये EMI घटणार? RBI ने दिले संकेत
10
"सीआरपीएफचे जवान नसते तर...", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जिरीबाममधील हल्ल्याची दिली माहिती
11
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
12
"आलियाला कपडे बदलायचे होते अन् क्रू मेंबर..." इम्तियाज अलीचा धक्कादायक खुलासा
13
Sensex-Nifty ग्रीन झोनमध्ये, बँक निफ्टी मजबूत; Adani Ent, Adani Port सह मेटल शेअर्स आपटले 
14
वडिलांनी खरेदी केलेल्या पहिल्या बाइकवर बसला भाईजान! बाप-लेकाचा फोटो पाहून चाहते म्हणतात- "स्वॅग असावा तर असा!"
15
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
16
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
17
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
18
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
19
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
20
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस

"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 3:48 PM

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत पटेल यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

Sharad Pawar ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप प्रकरणी दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही त्यांच्यावरील टीकेची झोड कायम असल्याचं दिसत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत पटेल यांचा खरपूस समाचार घेतला आहे. या लोकांनी लाचारी करण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असा हल्लाबोल पवार यांनी केला आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घातल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच महाराष्ट्रात याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शिवप्रेमींसह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी या प्रकारावरून प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांनी केलेल्या टीकेनंतर आता शरद पवार यांनीही याबाबत आपली भूमिका मांडली.

शरद पवार म्हणाले की, "जिरेटोप आणि महाराष्ट्राचा इतिहास राहिलेला आहे. तो जिरेटोप शिवाजी महाराजांसाठी ओळखला जातो. लाचारी असते, नाही असं नाही, पण लाचारीला काही मर्यादा असतात. त्या सगळ्या मर्यादा या लोकांनी सोडल्या आहेत," अशा शब्दांत पवार यांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं आहे.

प्रफुल्ल पटेलांनी काय खुलासा केला?

वादंगानंतर काल प्रफुल्ल पटेल यांनी एक पाऊल मागे घेत यापुढे काळजी घेऊ, असा शब्द शिवप्रेमींना दिला. जिरेटोप वादावर आपल्या एक्स हँडलवर प्रतिक्रिया देत प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे की, "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ."

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPraful Patelप्रफुल्ल पटेलNarendra Modiनरेंद्र मोदीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज