पवारांचे पुतणे आहेत, असू शकतात, मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढायचे; संजय राऊतांचा परखड सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 12:11 PM2023-08-14T12:11:59+5:302023-08-14T12:12:41+5:30
आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि राजीनामा मागावा अशी ही घटना आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. या राज्याचा कारभार वेड्या लोकांच्या हातात आहे, असे राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात मिंधे सरकार आल्यापासून मृत्युचं तांडव सुरु आहे. मृतांच्या कुटुबियांचा आक्रोश मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत पोहोचू शकला नाही, ते महाबळेश्वरला आरामासाठी गेलेत. ठाण्यात एवढे होऊन सुद्धा मुख्यमंत्री पोहोचले नाहीत, हे दुर्दैवी आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
त्यांचे जे पोपटलाल आहेत ते घोटाळे काढत बसले आहेत. त्यांनी कळव्यातल्या 18 लोकांबाबत संवेदना सुद्धा काढली नाही. भाजपने प्रश्न विचारला आहे का? लोकप्रतिनिधींचे राज्य नाहीय. जर लोकप्रतिनिधींचे राज्य असते तर मृत्यूचे राज्य टाळले गेले असते. ठाणे मुंबईमध्ये लोकप्रतिनिधित्व नाही आहे, त्यामुळे लोकांना मरणाला सामोरे जावे लागत आहे, अशी टीका राऊत यांनी शिवसेना शिंदे गट-भाजपवर केली.
आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि राजीनामा मागावा अशी ही घटना आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. या राज्याचा कारभार वेड्या लोकांच्या हातात आहे, असे राऊत म्हणाले.
परवा ज्या दोन नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाली, त्यावर काल आम्ही, नाना पटोले यांच्यात बैठक झाली. यामध्ये यावर चर्चा झाली. ते त्यांचे पुतणे आहेत, असू शकतात. मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढायचे, असा सवाल राऊत यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर व्यक्त केला आहे. आम्ही लोकांनी त्यांच्यासोबत बसायचे, नातीगोती सांभाळायची आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात लढायचं अशा प्रकारचे ढोंग शिवसेनेच्या डीएनएमध्ये नाही. लोकांच्या मनात संशय आणि संभ्रम होईल अशा लोकांच्या मनात भीष्मपितामहामुळे निर्माण होणं हे मान्य नाही . शरद पवार हे महाराष्ट्राचे इंडिया आघाडीचे नेते आहेत त्यांचा संवादाचा स्वभाव आहे. राज ठाकरेंबरोबर देखील आमचा दोस्ताना होता, पण आमचे मार्ग वेगळे आहेत, लोकांच्या मनात संभ्रम येईल असं नेत्यांनी वागू नये , असे राऊत म्हणाले.