लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : 'भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे म्होरके शरद पवार असून, त्यांचा खोटेपणा आता चालणार नाही. शरद पवारांचे केंद्रात, राज्यात दहा वर्षे सरकार होते, तेव्हा त्यांनी काय केले, असा सवाल उपस्थित करतानाच कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांना उद्धव ठाकरे साथ देत आहेत. महाविकास आघाडी म्हणजे 'औरंगजेब फॅन क्लब' असून उद्धव ठाकरे हे त्या क्लबचे नेते असल्याची घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी येथे केली.
भाजप प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन बालेवाडीत पार पडले. त्यात शाह यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, सरचिटणीस विनोद तावडे, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, पीयूष गोयल, आशिष शेलार, अश्विनी वैष्णव, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
केंद्राने दहा वर्षांत महाराष्ट्राला ४ लाख कोटी दिलेअमित शाह म्हणाले, आम्ही कामे केली. त्याचा हिशेब आमच्याकडे आहे. शरद पवारांचे केंद्रात, राज्यात दहा वर्षे सरकार होते, तेव्हा काय केले? केंद्रातील भाजप सरकारने दहा वर्षांत १० हजार ५ कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आहेत. रस्त्यांसाठी ७५ हजार कोटी, रेल्वे मार्गासाठी २ लाख कोटी दिले. ३१ लाख कोटी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी दिले. पालखी मार्गासाठी ११ हजार कोटी दिले. ही सर्व कामे आम्ही केली. पवारांनी कसला विकास केला? पवार यांनी त्यांची कामे दाखवावी.
...तर मराठा आरक्षण पुन्हा गायब होईलमी पुण्यात आलोय. शरद पवार यांना विचारतो, की त्यांनी दहा वर्षे कृषिमंत्री असताना काय केले? त्यांनी मराठा आरक्षण का नाही दिले? राहुलबाबा हे खटाखट पैसे देणार होते, त्याचे काय झाले? भाजप आरक्षणाला पाठिंबा देत आहे. पवार अडचणी निर्माण करताहेत.
जेव्हा महाराष्ट्रात भाजप सरकार येते, तेव्हा मराठा आरक्षण मिळते आणि शरद पवारांचे सरकार येते तेव्हा का जाते? २०१९ पर्यंत भाजपने आरक्षण टिकवले होते. त्यानंतर शरद पवारांचे सरकार आले व आरक्षण गायब झाले. आता भविष्यात शरद पवारांचे सरकार आले, तर आरक्षण गायब होईल, असेही शाह म्हणाले.मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. आमची तीच भूमिका आहे.
अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणासाठी लढाई सुरु केली. त्यांचा बळी गेला; पण तेव्हा आरक्षण दिले गेले नाही. आपले सरकार आले आणि आरक्षण दिले. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी का आरक्षण दिले नाही? त्यांनी सांगितले की, मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. ते आता मतांसाठी दुफळी निर्माण करीत आहेत.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
हे देशाला काय सुरक्षित करणार?■ देश सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिले आहे. येत्या दोन वर्षांत देश नक्षलवादापासून मुक्त करू. दहशतवाद मुळापासून काढू. देशाच्या सुरक्षेसाठी औरंगजेब फॅन क्लब काहीच करू शकत नाही.■ महाविकास आघाडीवाले म्हणजे फॅन क्लब आहेत. त्यांचे नेते उद्धव ठाकरे आहेत. कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांसोबत ते बसत आहेत. लाज वाटली पाहिजे त्यांना. हे देशाला काय सुरक्षित करू शकतील, असा घणाघात शाह यांनी ठाकरेंवर केला.