Bharat Jodo ला राष्ट्रवादीचेही पाठ'बळ', १० नोव्हेंबरला Rahul Gandhi यांच्यासोबत NCP चे नेतेही दिसणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 07:49 PM2022-11-07T19:49:46+5:302022-11-07T19:50:29+5:30

Bharat Jodo in Maharashtra, NCP: राष्ट्रवादीचे तीन बडे नेते १० नोव्हेंबरला यात्रेत होणार सहभागी

Sharad Pawar led NCP supports Rahul Gandhi led Bharat Jodo Yatra of Congress joining hands in Maharashtra on 10th November | Bharat Jodo ला राष्ट्रवादीचेही पाठ'बळ', १० नोव्हेंबरला Rahul Gandhi यांच्यासोबत NCP चे नेतेही दिसणार!

Bharat Jodo ला राष्ट्रवादीचेही पाठ'बळ', १० नोव्हेंबरला Rahul Gandhi यांच्यासोबत NCP चे नेतेही दिसणार!

Next

Bharat Jodo in Maharashtra, NCP: काँग्रेसच्या वरच्या फळीतील नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचे महाराष्ट्रात आज नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आगमन झाले. काँग्रेससह विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून 'भारत जोडो' यात्रेचे स्वागत केले जात आहे. आज महाराष्ट्रात रात्री ९ वाजता पदयात्रा प्रारंभ होऊन वन्नाळीकडे प्रयाण केले जाणार आहे. यावेळी हातात मशाली घेऊन मशाल यात्रा काढली जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत माजी मंत्री आणि ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे देखील सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. ९ नोव्हेंबरला नांदेड येथे आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. तशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही 'भारत जोडो'ला पाठिंबा देण्यात आले आहे. या यात्रेत राहुल गांधीसोबत राष्ट्रवादीचे बडे नेतेही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतेमंडळी भारत जोडो यात्रा शक्य तितकी भव्य दिव्य करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याच दरम्यान आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटातील काही खासदार आणि आमदार देखील या यात्रेत सहभाग घेणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या सहभागाने महाविकास आघाडी आणखी मजबूत होणार असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे. त्यातच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे ५५ दिवस 'भारत जोडो' यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात येत असून या उपक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करत आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. भारत जोडो या उपक्रमात राहुल गांधी यांच्यासमवेत १० नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे सहभागी होणार आहेत. शिवाय जाहीर सभेतही ही नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याचे तपासे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे, शरद पवार सहभागी होणार?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार देखील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र यात्रेत आपण सहभागी होण्याचे अजून ठरले नसल्याचे उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच शरद पवारांची प्रकृती ठीक असल्यास ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती माहिती अशोक चव्हाणांकडून देण्यात आली.

महाराष्ट्रातील 'भारत जोडो'चे स्वरूप

भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये चार आणि हिंगोली जिल्ह्यात चार दिवस मुक्काम करून विदर्भात वाशिममधून मार्गक्रमण करेल. नांदेड जिल्ह्यातील पहिला मुक्काम देगलूर येथे राहील. मंगळवारचा मुक्काम शंकरनगर रामतीर्थ, बुधवारी-वझिरगाव फाटा, गुरुवार- पिंपळगाव महादेव आणि शुक्रवारी पहाटे हिंगोली जिल्ह्याकडे रवाना होणार आहे. नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून १४ दिवस ही यात्रा तब्बल ३८४ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू असून राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये राहुल गांधींच्या यात्रेत शरद पवारांच्या सहभागाची उत्सुकता आहे. तसेच राहुल गांधींना महाराष्ट्रात किती प्रतिसाद मिळतो हे आगामी १५ दिवसांत दिसून येणार आहे.

Web Title: Sharad Pawar led NCP supports Rahul Gandhi led Bharat Jodo Yatra of Congress joining hands in Maharashtra on 10th November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.