राष्ट्रवादीला मोठ्ठी 'पॉवर'; शरद पवार उतरणार लोकसभेच्या रिंगणात?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 05:12 PM2019-02-08T17:12:26+5:302019-02-08T18:30:34+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह करण्यात आला.

sharad pawar may contest lok sabha election 2019 from madha constituency | राष्ट्रवादीला मोठ्ठी 'पॉवर'; शरद पवार उतरणार लोकसभेच्या रिंगणात?

राष्ट्रवादीला मोठ्ठी 'पॉवर'; शरद पवार उतरणार लोकसभेच्या रिंगणात?

Next

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असलेल्या लोकसभा मतदार संघाच्या इच्छुकांची आज पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माढा मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह करण्यात आला. यावर पवार यांनी विचार करणार असल्याचे सांगितल्याने राजकीय क्षेत्रात उत्सुकता लागली आहे. 


यावेळी पवारांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, गणेश नाईक, आनंद परांजपे आणि विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.


माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी विनंती विजयसिंह मोहिते पाटील आणि जवळपास सर्व वरिष्ठ सहकाऱ्यांनी केली, माझी इच्छा नाही पण विचार करू, असे आपण त्यांना सांगितल्याचे पवार म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कालचे भाषण वाचले, संसदेच्या सभ्यतेला हरताळ फासणारे भाषण होते. मोदी त्यांच्यावर जसे संस्कार त्याला सुसंगत बोलले, अशी टीकाही त्यांनी केली. लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक एकत्र झाली तर महाराष्ट्राच्या जनतेची 7 महिने आधी  सुटका होईल, असेही त्यांनी सांगितले. 

अजित पवार यांची 'शिरूर'साठी आवश्यकता नाही; का म्हणाले असे शरद पवार...


अण्णा हजारे यांचे उपोषण या विषयावर बोलणं, बातम्या वाचणे, पाहणे, गेली 2 वर्षे सोडून दिल्याचे त्यांनी सांगत प्रियांका गांधी यांच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशावर बोलणंही टाळले.

Web Title: sharad pawar may contest lok sabha election 2019 from madha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.