शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
3
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
4
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
5
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
6
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
7
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
8
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
9
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
10
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
11
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
12
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
13
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
14
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
15
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
17
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
18
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
19
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
20
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

शरद पवारांनी पुन्हा घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट; आठवड्यातील दुसऱ्या भेटीने चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 6:14 AM

या भेटीत विरोधी पक्षाच्या साखर कारखान्यांना नाकारण्यात आलेले कर्ज तसेच मराठा-ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते.

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शनिवारी पुन्हा भेट घेतली. आठवड्यात ही दुसऱ्यांदा भेट असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.  या भेटीत विरोधी पक्षाच्या साखर कारखान्यांना नाकारण्यात आलेले कर्ज तसेच मराठा-ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते.

राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून चांगलेच वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर २२ जुलै रोजी शरद पवार यांनी शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी आरक्षणाबरोबरच साखर कारखान्यांना थकहमी देताना कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. परंतु राज्य सरकारने नुकतीच ज्या कारखान्यांना थकहमी दिली आहे त्यातून शरद पवार गटाचे आमदार अशोक बापू पवार, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि विधान परिषदेची निवडणूक लढलेले अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या कारखान्याला कर्ज नाकारण्यात आले आहे. याबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे समजते. 

मराठा आरक्षणासंदर्भात आगामी काळात काही पावले उचलता येतील का, यासंदर्भातदेखील चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण