शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
2
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
3
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
4
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
5
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
6
विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू
7
गुटख्यातून जितकी कमाई, तितकीच डाग साफ करण्यात खर्च करते सरकार; तरीही का लागत नाही बॅन?
8
Share Market : आधी घसरण मग तेजी, शेअर बाजारात चढ-उतार सुरुच; बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी वधारले
9
१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर
10
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
11
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
12
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
13
"मी काळवीटाची शिकार केली नाही!" बिष्णोईच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
14
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
15
'केजीएफ' स्टार यश 'रामायण' मध्ये साकारणार रावणाची भूमिका, स्वत:च कन्फर्म करत म्हणाला...
16
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
17
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
18
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
19
१० व्या महिन्यात झाली डिलिव्हरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी झाली आई! सर्वांकडून अभिनंदन
20
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी

बँका पीककर्ज देण्यात अडथळे आणतात म्हणून शेतकरी सावकाराच्या दारात: जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 4:02 PM

या बँकांवर सरकार कडक कारवाई करत नसल्याचाही केला आरोप

Jayant Patil NCP on Farmers Crop Loans: व्यापारी बँका व काही खासगी बँका अल्पभूधारक शेतकऱ्यांना 'सिबिल'ची सक्ती करून पीककर्जाबाबत अडवणूक करत आहे. शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात ढकलणाऱ्या बँकांवर सरकार कडक कारवाई करत नाही. यातून सरकार व बँकांची ही 'मिलीभगत' आहे का अशी शंका उत्पन्न होते, अशी घणाघाती टीका शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. अशा परिस्थितीत बँका पीककर्ज देण्यात अडथळे आणतात म्हणूनच शेतकऱ्यांना नाइलाजाने सावकारांच्या दारात जावे लागते, असा आरोप जयंत पाटील यांनी केली.

जयंत पाटील म्हणाले, "सरकारच्या कारवाईच्या बडग्याला न भीता व्यापारी आणि खासगी बँका अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिबिलची सक्ती करून पीककर्जाबाबत अडवणूक करत आहेत. त्यामुळे शेतकरी राजाला सावकाराच्या दारात जावे लागत आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाच या बँका केराची टोपली दाखवत असतील तर सामान्य शेतकऱ्यांचे काय ऐकतील? त्यामुळे सरकारने या बँकांना लाडीगोडी न लावता कर्ज देत नसतील तर कठोरात कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे."

"सावकारी जाच पुढे शेतकऱ्यांना किती छळतो, या जाचामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संख्या वाढते याची सरकारला चांगली कल्पना आहे. तरी शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात ढकलणाऱ्या बँकांवर सरकार कडक कारवाई करताना दिसत नसेल तर ही सरकारची आणि बँकांची मिलीभगत आहे अशी शंका मनात येते," असेही त्यांनी आपल्या ट्विटरवरील प्रतिक्रियेत म्हटले आहे.

दरम्यान, पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडूनबँकांना दिल्या जाणाऱ्या ४.५ टक्के व्याज परताव्यात केंद्राने अर्धा टक्का कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षातील व्याजाची आकारणी नव्याने करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला किमान ८ कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. शेतकऱ्यांना मात्र पूर्वीप्रमाणेच व्याज सवलत कायम राहणार आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलGovernmentसरकारCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी