मुंबई: रविवारी नागपुरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली होती. विरोधी पक्षांना लक्ष्य करण्यासाठी सरकारी मंचांचा वापर करण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुप्रीमो शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पवार म्हणाले, यापूर्वी कोणत्याच पंतप्रधानांनी सरकारी कार्यक्रमांचा उपयोग विरोधकांवर हल्ला करण्यासाठी केला नाही.
सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, 'पूर्वीचे पंतप्रधान केवळ राजकीय सभा आणि प्रचारात विरोधकांवर टीका करायचे. आजवर पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अनेक पंतप्रधानांची भाषणे पाहिली आणि ऐकली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी सरकारी कार्यक्रमांमध्ये विरोधकांवर टीका केली नाही.'
'निवडणूक प्रचारातही नेहरूंनी कधीच विरोधकांवर टीका केली नाही. विरोधी पक्ष, विरोधी पक्षनेता हा लोकशाहीचा भाग आहे, असा त्यांचा आदर असायचा. पंतप्रधानांनी विरोधी पक्षांवर टीका करण्यासाठी रुग्णालयांचे, एक्स्प्रेसचे वेचे उद्घाटन, अशा सरकारी कार्यक्रमांचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे किती न्याय्य आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे, अशी टीका पवारांनी केली,' अशी टीका पवारांनी केली.
काय म्हणाले होते पीएम मोदी?
रविवारी नागपुरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली होती. राजकीय पक्ष अल्पकालीन फायद्यासाठी राजकारण करून मतदारांना फसवत आहेत. विरोधकांनी शॉर्टकटद्वारे देशाचे भवितव्य ठरवू नये. विरोधक नेहमी विकास प्रकल्पांना विरोध करत असतात, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली होती.