मुंबई : भाजपने सत्तास्थापन करण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, काँग्रेसने अद्याप कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, असे पवार यांनी सांगितले. राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत असताना खा. शरद पवार यांचे ‘सिल्व्हर ओक’ या घडामोडींचे निवासस्थान या घडामोडींचे केंद्र बनले आहे. रविवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी खा. पवार यांची भेट घेतली. उभयतांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना पटेल म्हणाले, आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल जनतेने दिला आहे. शिवाय, सरकार स्थापन करण्याएवढे संख्याबळ नाही. मात्र, शिवसेनेला पाठिंबा देणार का, यावर त्यांनी ‘ब्र’ही उच्चारले नाही.राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या बाजुचे आहेत. मात्र काँग्रेसने पाठिंबा देण्यास नकार दिला तर त्यांची पंचाईत होऊ शकते. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात यावर बरेच काही अवलंबून आहे. यासंदर्भात शरद पवार हे सोनिया गांधी यांची परत भेट घेऊ शकतात, असे एका नेत्याने सांगितले. दरम्यान, राष्टÑवादी काँग्रेसच्या आमदारांची मंगळवारी बैठक आयोजित केली असून या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा आणि सत्तेत सहभागी होण्याबाबत निर्णय होणार असल्याचे समजते.>राष्ट्रवादीच्या त्याच अटीशिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील काँग्रेस प्रमाणेच अटी घातल्या आहेत. शिवसेनेने आधी केंद्र सरकार आणि एनडीएतून बाहेर पडावे. त्यानंतरच पाठिंब्याबाबत विचार करता येईल, असे मलिक यांनी सांगितले.>आम्हाला विरोधात बसण्याचा कौल जनतेने दिला आहे. आम्ही सध्या काहीही बोलणार नाही. आधी शिवसेनेने आम्हाला प्रस्ताव द्यावा लागेल. त्यातून काही सर्वसमावेशक व सर्वांना मान्य होईल असा कार्यक्रम तयार करावा लागेल. निवडणुका किंवा राष्टÑपती राजवट कोणालाही नको आहे. पण यावर आमचे नेते शरद पवार आपली भूमिका योग्यवेळी जाहीर करतील.- नवाब मलिक, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी
काँग्रेसच्या निर्णयाकडे राष्ट्रवादीचे लक्ष, शरद पवारांची भूमिका ठरणार निर्णायक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 5:40 AM