ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 26 - भाजपा-शिवसेना युती तुटल्यामुळे राज्यापुढे मध्यावधी निवडणुकीचा पर्याय असू शकतो पण सत्ता सर्वांना प्रिय आहे, निवडणुकीपुर्वी भाजपा-शिवसेनेनं तोडलेली युती पुन्हा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकाचा प्रश्नच नाही. जर शिवसेनेनं सत्ता सोडली तर आम्ही राज्यात कोणालाही पाठिंबा देणार नाही, तर निवडणुकीला सामोरे जाऊ असे शरद पवार नांदेड येथे म्हणाले. राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये युती करण्यासाठी ते अशोक चव्हाण यांची भेट घेण्यासाठी आले होते. राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आघाडीसाठी शरद पवारांनी काँग्रेसबरोबरच्या आघाडीला संमती दर्शवली आहे. यामुळे राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये आघाडीची सत्ता स्थापण होणार आहे. मुंबईतील काँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार यावर बोलताना ते म्हणाले की मुंबईबाबतचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील' मुंबईबाबत कॉंग्रेसचं काय धोरण आहे माहीत नाही असे ते म्हणाले.
दरम्यान, 18 नोव्हेंबर 2016 रोजी अलिबाग येथे शरद पवार यांनी मध्यवधी निवडणुकीचे संकेत दिले होते. राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असून कार्यकर्त्यांनी त्यासाठी तयारीला लागावे असे विधान शरद पवार यांनी केले होते. भाजपा सरकार स्थिर राहावे यासाठी राष्ट्रवादीने मक्ता घेतला नसल्याचे सांगत शरद पवार यांनी महाराष्ट्रातील राजकारणात अस्थिरतेचे ढग दाटून आले होते.