पुणे : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी विरोधी पक्ष सोडताना दिसत नाही.शरद पवार यांनी पण केंद्र सरकारवर कृषी कायदे व शेतकरी आंदोलन यावरून अनेकदा निशाणा साधला आहे. तसेच काही सल्ले देखील दिले आहेत. पवार यांनी शेतकरी कायद्याबाबत रविवारी रात्री एक ट्विट केले. त्या ट्विटवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच पवारांनी खरं तर आता शेतकऱ्यांना घरी जाण्याचा सल्ला द्यावा अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, लोकसभा आणि राज्यसभेत हे कृषी कायदे ज्या दिवशी पारित करण्यात आले त्यावेळी कायद्याबाबत चर्चा व्हायला हवी होती असे जर शरद पवारांना अपेक्षित होते तर त्यादिवशी त्यांनी राज्यसभेत उपस्थित राहणे गरजेचे होते. मात्र ते अनुपस्थित राहिले.
पाटील म्हणाले, केंद्र सरकारकडून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचे अनेकदा प्रयत्न केले. केंद्र सरकारने आणखी काय करायला पाहिजे हे मला समजत नाही. तसेच आता न्यायालयाने कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला दीड वर्षांसाठी स्थगिती दिली आहे. त्यामुळे या कालावधीत चर्चा घडणार असून शेतकरी वर्गाला विश्वासात सुद्धा घेतले जाणार आहे. पण तरी हा आडमुठेपणा सुरु आहे. त्याचमुळे आता शरद पवार यांनीच शेतकर्यांना आपापल्या घरी जाण्याचा सल्ला द्यायला हवा, कारण आता शेतकऱ्यांचे बर्यापैकी समाधान झाले आहे.
देशातील शेतकऱ्यांना सुखी आणि सुरक्षित करणारा अर्थसंकल्पपंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्यांना सुखी आणि सुरक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यातूनच शेतकर्यांना भरीव तरतूदी मिळतील अशी अपेक्षा आहे. तसेच मध्यम वर्गाची अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्प कितीही मोठा असला तरी नेते केवळ अंदाज बांधू शकतात.