मुंबई : सुजय हा शरद पवारांसाठी नातवासारखा आहे. त्यामुळे त्यांनी नातवाला आशीर्वाद द्यावेत, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडविण्याचे आवाहनकेले.
सुजय विखे-पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीने नगरची जागा सोडावी, अशी मागणी होत आहे. राष्ट्रवादीने जागा न सोडल्यास थेट भाजपातून सुजय यांनी निवडणूक लढवावी, अशी भूमिका स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली. तसेच प्रदेश पातळीवरून नगरची जागा सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न होत नसल्याचा आरोपही झाला.
या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करताना विखे-पाटील म्हणाले की, नगरच्या जागेबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि प्रभारी मल्लिकार्जुन खर्गेही त्यासाठी प्रयत्नशील आहेत. मी स्वत: शरद पवार यांना या जागेबाबत विनंती केली असून आशावादी असल्याचे विखे-पाटील म्हणाले.काही कार्यकर्त्यांनी भाजपाबाबत वक्तव्ये केली असली तरी ती सर्वांची अथवा पक्षाची भूमिका नाही. काँग्रेस नेता म्हणून पक्षश्रेष्ठीया जागेबाबत जो निर्णय घेतील त्यानुसार सर्व कार्यकर्त्यांना घेऊन काम करणार असल्याचे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.पवार-विखे वाद कधीच संपला!पवार आणि विखे-पाटील घराण्यातील वैमनस्यामुळे नगरचा तिढा सुटत नसल्याबाबत विचारले असता, माझे वडील आणि शरद पवारांचे वैचारिक मतभेद होते, संघर्ष होता. माझ्या वडिलांच्या निधनाला आता दोन वर्षे झाली. किंबहुना त्यापूर्वीच तो संघर्ष संपला होता. त्यामुळे शरद पवार यांच्या मनात तसे काही असेल, असे मला वाटत नाही, असे विखे पाटील म्हणाले.