शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 3:29 PM

Loksabha Election - शरद पवारांच्या विश्वासू युवा शिलेदार असलेल्या सोनिया दुहन यांनी सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. 

मुंबई - Sonia Doohan on Supriya Sule ( Marathi News ) सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आसपासच्या लोकांमुळे शरद पवारांवर निष्ठा असणारे अनेक लोक आज पक्ष सोडून जातायेत. त्याचे उत्तर सुप्रिया सुळेंना द्यावे लागेल. अनेकदा शरद पवारांकडे आम्ही आमचं म्हणणं मांडलं, परंतु   शेवटी ती मुलगी आणि बाहेरचे अशा शब्दात शरद पवार गटाच्या युवती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन यांनी नाराजी बोलून दाखवली. 

सोनिया दुहन यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मी अजून पक्ष सोडला नाही. अन्य कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही. मी कालच्या बैठकीला होते, मग असं पाहायला गेले तर जेव्हा पक्षात फूट पडली, आमदारांच्या बैठकीवेळी सुप्रिया सुळेही तिथे होत्या. मग त्यांनी अजित पवारांचा पक्ष जॉईन केला का? त्यामुळे मी अजून पक्षप्रवेश केला नाही. शरद पवारांना आणि राष्ट्रवादीला सोडलं नाही. परंतु काही गोष्टी मला सर्वांसमोर आणायच्या आहेत. धीरज शर्मा असो वा अन्य लोक, माझ्यासारखे बरीच वर्ष निष्ठेने शरद पवारांसोबत काम करतायेत. शरद पवारांसाठी काहीही करण्यास तयार असलेले हे लोक अचानक पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतायेत? अजून कुणाचं सरकार आलं नाही. ४ जूनचा निकाल लागला नाही. मी इतकी वर्ष पक्षात काम केल्यानंतर एक सांगते, आमची पूर्ण निष्ठा शरद पवारांवर आहे. परंतु शरद पवारांची मुलगी म्हणून सुप्रिया सुळेंचा आदर आहे. मात्र त्या आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आसपासच्या लोकांमुळे आमच्यासारखे लोक ज्यांची शरद पवारांवर निष्ठा आहे ते पक्षाला सोडून चाललेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच मी अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही. मात्र मागील अनेक दिवसांपासून पक्षात घुसमट होतेय. सुप्रिया सुळेंच्या आसपासच्या लोकांमुळे, निर्णय घेणाऱ्यांमुळे जे शरद पवारांसोबत २०-२५ वर्षापासून आहेत त्यांना पक्षाबाहेर जाण्यास मजबूर केलं जातंय. आम्हाला पक्ष सोडायचा असता तर निवडणुकीतच आम्ही निर्णय घेतला असता. सुप्रिया सुळे या स्वत:चं नेतृत्व सिद्ध करू शकल्या नाहीत असं सोनिया दुहन यांनी म्हटलं. 

दरम्यान, सुप्रिया सुळेंना याचं उत्तर द्यावे लागेल. इतकी वर्ष निष्ठेने काम करणारे लोक का सोडून जातायेत, याचं विचार मंथन सुप्रिया सुळेंनी करायला हवं. मी भाजपात जाणार नाही. मी पक्ष सोडेन किंवा या विधानांमुळे मला पक्षातून काढलं जाईल पण मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. आम्ही पक्षात चर्चा करण्याचा प्रयत्न केला. साहेबांनीही प्रयत्न केलेत. परंतु त्यावर काहीच तोडगा निघाला नाही. आम्ही स्पष्टपणे आमच्या समस्या साहेबांसमोर मांडल्या होत्या. त्यानंतर असं जे घडलं, त्यामुळे आम्ही कितीदा या समस्या साहेबांकडे मांडायच्या, त्यांना द्विधा मनस्थितीत ठेवायचं हा प्रश्न आम्हाला पडला. कारण अखेर ती मुलगी आहे आणि आम्ही बाहरचे असंही सोनिया दुहन यांनी सांगितले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४