शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

शरद पवार पूरग्रस्त भागात स्वातंत्र्य दिन साजरा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 6:11 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार स्वातंत्र्य दिन पूरग्रस्त भागात साजरा करतील.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार स्वातंत्र्य दिन पूरग्रस्त भागात साजरा करतील.सातारा, सांगली, कोल्हापुरात महापुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. १४, १५ आॅगस्टच्या दौऱ्यासाठी पवार मंगळवारी रात्री कराडला दाखल होतील. बुधवारी सकाळी कराडहून हातकणंगले व शिरोळचा दौरा करतील. १५ आॅगस्टला शिरोळमध्ये ध्वजवंदनानंतर ते कोल्हापूरकडे रवाना होतील. चिखली, आंबेवाडी, वडंगे, कसबा बावडा या गावांना भेटी देतील. नंतर कोल्हापुरात पत्रकार परिषदेला संबोधित करून पुण्याकडे निघतील.‘त्या’ शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा - राष्ट्रवादीची मागणी मुंबई : राज्यातील सर्व पूरग्रस्त/अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकºयांचे जून २०१९ अखेरपर्यंतचे सर्व थकित कर्ज, व्याजासह सरसकट माफ करावे, नवीन पीक कर्ज तातडीने उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन झालेल्या नुकसानीसाठी केंद्र सरकारकडून किमान ४ हजार कोटी रुपयांची तातडीची मदत प्राप्त करुन घ्यावी. सर्व पंचनामे व नुकसानीची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर एनडीआरएफच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करावा अशी मागणीही राष्टÑवादीने केली. पाण्याखाली असणाºया पिकांना, ऊसाला व आंबा, काजूसारख्या सर्व फळपिकांना हेक्टरी १ लाख रुपये, भाताला ५० हजार, नाचणीसाठी ४० हजार रुपये अनुदान द्या, शेतपिक नुकसानीसाठी शेतकºयांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत जाहीर करा, खरवडलेल्या जमिनींसाठी, शेतीतील गाळ काढण्यासाठी प्रति हेक्टर २५ हजारांची मदत जाहीर करा. शेतकरी व शेतमजुरांना ४० हजार रुपये रोख द्या अशा मागण्या त्यांनी केल्या.पूरग्रस्त भागात ४८ तासांपेक्षा अधिक काळ पाण्याखाली असलेल्या मालमत्तांना नुकसानभरपाईची अट शिथिल केल्याची घोषणा सरकारने केली आहे. याचा शासन निर्णय तातडीने काढा, वाहून गेलेल्या पशूधनाची नुकसान भरपाई द्या अशी मागणीही त्यांनी केली आहे.पुराची पारदर्शक माहिती कधी देणार? - सुप्रिया सुळेमुंबई : ‘पारदर्शक’ हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आवडता शब्द आहे. पूरग्रस्त भागात सध्या काय परिस्थिती आहे, मदतकार्याची स्थिती काय आहे, परिस्थिती इतकी बिकट होईपर्यंत प्रशासन काय करत होते, आदी प्रश्नांची पारदर्शक उत्तरे मिळायला हवीत, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.मंगळवारी मंत्रालयात पत्रकार परिषदेत सुळे म्हणाल्या की, पूरग्रस्तांना तातडीची मदत पोहोचविणे, औषधांचा साठा देणे, घरे तत्काळ कशी उभी करता येतील हे पाहणे आवश्यक आहे. केवळ घर दिले, बिस्किटचा पुडा दिला म्हणून जबाबदारी संपत नाही. लोकांना त्यांच्या पायावर उभे करण्याची जबाबदारी आपली आहे. लातूर भूकंपानंतर शरद पवार सलग १५ दिवस प्रशासनाला सोबत घेत नेतृत्व करीत होते. अशा आपत्तीत ठाण मांडूनच बसावे लागते. लोकांना वेळ द्यावा लागतो. शरद पवार आजही कराडला जात आहेत. राष्ट्रवादीचे सगळे नेते अंग झटकून काम करीत आहेत, असेही सुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर