मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या सलग संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि विधानसभेत सलग ५० वर्षे पूर्ण करणा-या ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव शनिवारच्या ऐवजी शुक्रवारी मांडला जाणार आहे. शरद पवार यांच्याविषयी अनेक सदस्यांना बोलायचे आहे, त्यामुळे शनिवारचा वेळ पुरणार नाही म्हणून ही चर्चा शुक्रवारीच घ्या असा आग्रह विरोधी पक्षाने धरला.गृहनिर्माण मंत्र प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यावरुन सुरु झालेला डेडलॉक ही यानिमित्ताने संपेल व विरोधक सभागृहात कामकाजासाठी येतील या हेतूने सत्ताधारी पक्षाने देखील त्यास मान्यता दिल्याचे समजते. शनिवारी देखील पवार आणि देशमुख यांच्या ठरावावरील भाषणे होतील की नाही हे चित्र शुक्रवारी स्पष्ट होईल.
शरद पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव आज येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 3:57 AM