मलिक, देशमुख, राऊत घाबरले नाहीत अन् तुम्ही..; शरद पवारांचा अजितदादा गटावर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 11:35 PM2023-08-25T23:35:28+5:302023-08-25T23:36:21+5:30
प्रामाणिकपणे समाजकारण करणाऱ्या लोकांच्याबाबतीत असे केले जाते. आम्ही घाबरून जाऊ असं त्यांना वाटले
कोल्हापूर – एकदा निवडणुकीपूर्वी मला ईडीची नोटीस आली. ईडीची नोटीस आल्यानंतर मी उद्या काय आत्ताच येतो सांगितले. मी येतोय जाहीर केले त्यानंतर ईडीचे अधिकारी, पोलीस आयुक्त घरी आले. तुम्ही आता ईडी कार्यालयात जाऊ नका, बँकेच्या व्यवहारासाठी मला ईडी नोटीस पाठवली. ज्या बँकेचा मी सभासद नव्हतो, त्या बँकेत माझी ठेव नव्हती. काहीही नव्हते पण एकप्रकारे भीती घालण्यासाठी नोटीस पाठवली. आज असं धाडस लोकांनी दाखवले पाहिजे. ज्याची भूमिका सत्याची असते त्याला चिंता करण्याचे कारण नाही असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
कोल्हापूरच्या सभेत शरद पवारांनीअजित पवार गटातील नेत्यांना टोला लगावला. शरद पवार म्हणाले की, सत्तेचा वापर विरोधी पक्षातील लोकांना त्रास कसा द्यायचा यासाठी वापरली जाते. अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते, स्पष्ट भूमिका घेत होते. त्यामुळे त्यांना आवार घालायचं म्हणून खोटा खटला दाखल केला. १२ महिने राज्याचा गृहमंत्री तुरुंगात जातो. परंतु हा गृहमंत्री स्वाभिमानी माणूस होता. त्यांना सांगितले, तुम्ही आमच्या पक्षात या, गटात या जर आला नाही तर तुमची जागा आत आहे. देशमुखांनी स्पष्ट सांगितले. माझी जागा तुरुंगात असो वा कुठेही मी सत्याची साथ सोडणार नाही. कुठलीही तडजोड करणार नाही असं त्यांनी म्हटलं.
तर आज सामनाचे संपादक संजय राऊत ते लिहितात, त्यांनाही तुरुंगात टाकले. त्यांनाही सांगितले तुम्ही हे बंद करा, ते म्हणाले सत्य लिहिण्याचा अधिकार माझा आहे. तो मी बंद करणार नाही म्हणून त्यांनाही तुरुंगात टाकले. नवाब मलिक राष्ट्रवादीचे नेते, प्रवक्ते, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करत होते त्यांनाही तुरुंगात टाकले. २ महिन्यासाठी त्यांना जामीन मिळाला आहे. प्रामाणिकपणे समाजकारण करणाऱ्या लोकांच्याबाबतीत असे केले जाते. आम्ही घाबरून जाऊ असं त्यांना वाटले असा चिमटा शरद पवारांनी भाजपाला काढला.
दरम्यान, देशमुख, मलिक, राऊत घाबरले नाहीत, पण आज राजकारण कसं बदलतंय त्यादृष्टीने पाऊले टाकली जातेय. महाराष्ट्रात ईडीच्या नोटीसचा दम काही लोकांना दिला, काहींनी धुडकावले तर काहींनी भूमिका बदलली. कोल्हापूरचा इतिहास श्रौर्याचा आहे. इथे ईडीची नोटीस आल्यावर त्याला सामोरे जाण्याची ध्येय दाखवतील असं मला वाटलं परंत चित्र वेगळे निघाले. कोल्हापूरात ईडीची नोटीस आली, घरी सीबीआय, आयकर खात्याचे लोक गेले. आमच्यासोबत काम करणारे लोक मला वाटलं स्वाभिमान असेल. ज्या घरातील भगिनी म्हणते, तुम्ही एकवेळ गोळ्या घाला, पण असा त्रास देऊ नका, त्या घरातील कर्ता पुरुष असं म्हटलेले ऐकलं नाही. ज्या भगिनींनी धाडस दाखवले तसं धाडस दाखवण्याऐवजी भाजपासोबत जाऊन ईडीपासून सुटका करू अशी भूमिका त्यांनी घेतली असं म्हणत शरद पवारांनी नाव न घेता हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघात केला.
शेतकऱ्यांचा अपमान देशाच्या इतिहासात कुणी केला नसेल तितका मोदी सरकारने केला
ऊसाचं पीक घेणारा हा जिल्हा, इथं साखर, गूळ तयार होते. परंतु साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार आहे. सप्टेंबरपासून साखर निर्यात होणे बंद होईल. त्यामुळे साखरेची किंमत मिळणार नाही. त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होईल. जे जे शेतकरी तयार करतो त्याला आवर कसा घालायचा ही भूमिका सरकारची आहे. दिल्लीत १ वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केले, कुटुंबासह १२ महिने दिल्लीच्या सीमेवर बसले होते. पण मोदी सरकारने त्यांच्याकडे पाहिले नाही. शेतकऱ्यांचा अपमान मोदी सरकार इतका दुसऱ्या कुठल्याही सरकारने देशाच्या इतिहासात केला नाही. त्यामुळे अशांना सत्तेत बसवायचे की नाही याचा निकाल जनतेला घ्यायचा आहे असंही शरद पवार म्हणाले.