पुणे - एका माजी राष्ट्रपतीचा भावी राष्ट्रपतीच्या हस्ते सत्कार होत आहे, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले आणि त्याला टाळ्यांच्या कडकडाटाची दाद मिळाली. अनेकांच्या मनात अजूनही पवार यांना देशाच्या सवोच्च पदावर पाहण्याची आस आहे, याचे प्रत्यंतर यानिमित्ताने आले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणाºया गौरव ग्रंथाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते शनिवारी बालगंधर्व रंगमंदिरात झाले.मला लोकांमध्ये रहायला आवडतेराष्ट्रपती, राज्यपाल झाले की निवृत्त झाले असे समजतात. मला तसे व्हायचे नाही, मला लोकांमध्ये रहायला आवडते व सध्याआहे तेच चांगले आहे. शिंदे मात्र याला अपवाद आहेत. त्यांनी मारली तशी उडी मला मारायची नाही व ती जमेल असेही वाटत नाही, ’’असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार भावी राष्ट्रपती - सुशीलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 7:34 AM