शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 22:10 IST

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे.

Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शप) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. आपली प्रचारसभा आटोपून अनिल देशमुख परतत होते, यावेळी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली, ज्यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे.

देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापतमिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख काटोल मतदार संघातील नरखेड येथील सभा आटपून तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत होते. यावेळी काटोल-जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात देशमुख यांच्या डोक्याला गंभीर गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांना उपचारासाठी काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. 

पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवर अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून, राज्य सरकारवर घणाघाती टीका करण्यात आली आहे. 'राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे उडवले जात आहेत. याचे उदाहरण आज निवडणुकीच्या सांगता सभेवरून घरी परतताना राज्याचे माजी गृहमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातून समोर आले. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे,' असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

या हल्ल्यानंतर सुप्रिया सुळे यांनीदेखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला.‌ ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील या घटेवर तीव्र प्रतिक्रिया दिली. राज्याचे माजी गृहमंत्री व आमचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध..! राज्यात कायदा व सुव्यवस्था केवळ कागदावर राहिली आहे. ऐन निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या गाडीवर असे जीवघेणे हल्ले होत असतील तर राज्य खरंच जंगलराजकडे वळला आहे, हे आता सिद्ध झालं आहे. महाराष्ट्राने अशी विकृती कधीच पाहिली नव्हती. विशेषत: नागपुरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात भाजप सपशेल झाली असून गुन्हेगारांना इथे बळ मिळाले आहे. या हल्ल्याची सखोल चौकशी होऊन आरोपींना लवकरात लवकर गजाआड करावे अशी आमची मागणी आहे, असं आव्हाड म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBJPभाजपा