- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिशुवर्गात शिकणाऱ्या ४० विद्यार्थ्यांनी शुल्क न भरल्यामुळे त्यांना शाळेत येण्यास मज्जाव करण्याची घटना सोमवारी शारदाश्रम शाळेत घडली. त्यानंतर शाळेच्या विश्वस्तांनी पालकांशी चर्चा करून काही विद्यार्थ्यांना शुल्कमाफी देण्याचे ठरवत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला.मोठ्या शिशुवर्गाला ‘राइट टू एज्युकेशन’ (आरटीई) लागू नसल्याने कमी शुल्क आकारणी केल्यास आर्थिक डोलारा सांभाळणे शक्य नाही. त्यामुळे वाढीव फी वसूल करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन तास बाहेर उभे करण्यात आले. सोमवारी नेहमीप्रमाणे मोठ्या शिशूचे विद्यार्थी शाळेत पोहोचले, पण दादर येथील शारदाश्रम शाळेने त्यांना आत येण्यास मज्जाव केला. मोठ्या शिशुवर्गाचे शुल्क २५ हजार २०० इतके होते. ते वाढवून ४२ हजार रुपये करण्यात आले. काही पालकांना इतकी रक्कम भरणे शक्य नसल्याने शुल्क भरले नाही. त्यामुळे शाळा प्रशासनानेया विद्यार्थ्यांना बाहेर उभे केले.यानंतर मनसेचे विभाग अध्यक्षयशवंत किल्लेदारांसह पदाधिकाऱ्यांनी विश्वस्तांची भेट घेत मध्यस्थी केली.शुल्क माफ करणारया प्रकरणाची दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये असे वाटते. त्यामुळे या ४० विद्यार्थ्यांपैकी ४ ते ५ विद्यार्थ्यांचे शुल्क शाळा माफ करणार असल्याचे आश्वासन शाळेने दिले आहे.