नागपूर : गेल्या पिढीतील ख्यातनाम मराठी कथालेखक शरश्चंद्र टोंगो यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘लोकमत’ने राज्य स्तरावर आयोजित केलेल्या कथा स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा २४ नोव्हेंबरला सकाळी ११ वा. यवतमाळ येथील मातोश्री सभागृहात साजरा होत असून, महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे त्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ््याचे अध्यक्षस्थान ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा हे भूषवतील. या सोहळ््याला राज्यमंत्री संजय राठोड, खा. भावना गवळी, आ. मदन येरावार व प्रा. अरुण हळबे हे उपस्थित राहतील. ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित असतील.शरश्चंद्र टोंगो हे यवतमाळचे भूषण मानले गेलेले व मराठी कथाविश्वाला एक वेगळे व आकर्षक वळण देणारे कथालेखक होते. खांडेकर, फडके व माडगूळकरांसारखे ज्येष्ठ कथालेखक ज्या काळात लिहीत होते, त्या काळात आपल्या कथेचा आगळा ठसा उमटविण्याचा मान टोंगो यांच्याकडे जातो. त्यांनी ‘लोकमत’च्या आरंभकाळात त्यात लेखन केले व त्याचा वाङ्मयीन दर्जा उंचावला. या कथास्पर्धेत मराठीतील पाचशेहून अधिक लेखक व लेखिकांनी भाग घेतला. या सहभागात तामिळनाडूपासून महाराष्ट्रापर्यंतचे अनेक नवे व जुने लेखक एकत्र आले. या कथांमधून पुरस्कारासाठी कथांची निवड करणे अवघड व्हावे, एवढ्या या सगळ््या कथा दमदार व चांगल्या होत्या. ज्येष्ठ संपादक वामनराव तेलंग यांनी परिक्षण पूर्ण केले. पाचशे कथांमधून त्यांनी पहिल्या पाच कथा निवडल्या.
शरश्चंद्र टोंगो राज्यस्तरीय कथा स्पर्धा
By admin | Published: November 19, 2015 2:01 AM