शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

शार्दूल, आदित्यचा शोधनिबंध ‘जेटीआरआय जर्नल’मध्ये

By admin | Published: June 04, 2016 3:31 AM

विधि क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘न्यायिक प्रशिक्षण आणि संशोधन संस्थे’च्या (जेटीआरआय जर्नल) वार्षिक अंकात प्रवीण गांधी विधि विद्यालयाचे शार्दूल कुलकर्णी

मुंबई : विधि क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘न्यायिक प्रशिक्षण आणि संशोधन संस्थे’च्या (जेटीआरआय जर्नल) वार्षिक अंकात प्रवीण गांधी विधि विद्यालयाचे शार्दूल कुलकर्णी (द्वितीय वर्ष) आणि आदित्य मनुबरवाला (तृतीय वर्ष) या दोन तरुण विद्यार्थ्यांचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. एवढ्या कमी वयात केलेल्या या कामगिरीमुळे त्यांचे विधि क्षेत्रात कौतुक होत आहे. जेटीआरआय जर्नल या वार्षिकांकाचे काम सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती डॉ. डी. वाय. चंद्रचूड आणि मेघालय हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश दिनेश माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. या वार्षिक अंकात हायकोर्टाच्या पाच नामांकित न्यायाधीशांचे लेख आहेत; तसेच इतरही अनेक प्रख्यात विधिज्ञांनी लिखाण केले आहे. अशा अंकात शार्दूल आणि आदित्य यांचा ‘व्हेक्सेशिअस लिटिगेशन इन इंडिया : लीगल पोझिशन अ‍ॅण्ड पॉसिबल रिफॉर्म्स’ हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. यापूर्वीही ‘दी प्रॅक्टिकल लॉयर, सुप्रीम कोर्ट केसेस पब्लिकेशन’ने या दोघांचा शोधनिबंध प्रसिद्ध केला होता. (प्रतिनिधी) मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळा चर्चेत आल्यानंतर तेथील सरकारने विनाकारण त्रास देण्यासाठी न्यायालयात दाखल केल्या जाणाऱ्या खटल्यांच्या निवारणासाठी कायदा केला. असा कायदा अन्य कोणत्या राज्यात आहे आणि तोच केंद्रीय पातळीवरही करणे शक्य आहे का? याचा शार्दूल आणि आदित्य यांनी अभ्यास केला. मध्य प्रदेशप्रमाणे आजमितीस महाराष्ट्र आणि तामिळनाडूतही असा कायदा आहे. केंद्रीय पातळीवरही असा कायदा झाल्यास कुहेतूने एखाद्यावर खटला भरवणाऱ्यांना चाप बसणार असून, त्यामुळे न्यायव्यवस्थेवरील ताणही कमी होणार आहे; शिवाय असे कोर्ट कज्जे करणाऱ्यांवर ठपका ठेवण्याचा अधिकारही न्यायाधीशांना मिळणार आहे.