शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाईफेक

By admin | Published: August 09, 2014 3:04 AM

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याची मागणी करीत शुक्रवारी इंदापूर तालुक्यात सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अंगावर शाई टाकण्यात आली.

बारामती / पळसदेव (जि. पुणो) : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याची मागणी करीत शुक्रवारी इंदापूर तालुक्यात सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अंगावर शाई टाकण्यात आली. त्यामुळे त्यांच्या डोळ्याला इजा झाली आहे. त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी सचिन मलगुंडे आणि दादा थोरात (रा. भिगवण, ता. इंदापूर) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.  या घटनेचे पडसाद भिगवणसह इंदापूर तालुक्यात उमटून ठिकठिकाणी बंद पुकारण्यात आला होता.
भिगवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ‘ट्रॉमा केअर’च्या उद्घाटनानंतर बाहेर पडताना पाटील यांना धनगर समाजाच्या कार्यकत्र्यानी आरक्षणासंदर्भात निवेदन दिले. त्याचवेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचा युवक उपाध्यक्ष सचिन मलगुंडे याने हातातील पिचकारीतून पाटील यांच्या दिशेने शाई फेकली. ती पाटील यांच्या डोळ्यात गेली. हे पाहून काँग्रेस कार्यकत्र्यानी मलगुंडेवर हल्ला चढविला. पोलिसांनी लगेच मलगुंडे याला ताब्यात घेतले.  
पाटील यांच्या बुबुळास जखम झाली असून पापणीच्या खालचा भाग भाजला. तसेच डाव्या हाताच्या कोपराला व उजव्या पायाच्या अंगठय़ालाही भाजले आहे. रुबी हॉलचे डॉ. राजेश देशपांडे यांनी सांगितले की, पाटील यांच्यावर फेकलेल्या शाईत कोरोङयु नामक रसायन आहे. त्याची बाधा झाल्यास पूर्ण डोळा खराब होण्याची शक्यता असते. रंगांत मिश्रण म्हणून हे रसायन वापरले जाते. औषधोपचारांनतर त्यांचा डोळा पूर्ववत होईल.
 
लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा हक्क असतो, पण असे प्रकार झाले तर काम करणो अवघड होईल.
- हर्षवर्धन पाटील
 
हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचे दिसते. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काही राजकीय पक्ष धनगर समाज आरक्षणाच्या मुद्यावर पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री