शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

तीन मुलांच्या आईसोबत त्यानं जमवलं सूत

By admin | Published: December 22, 2016 9:48 PM

तीन मुलांची आई, तिच्यापेक्षा १० वर्षे वयाने लहान असलेल्या युवकाच्या प्रेमात पडली

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 22 - ती तीन मुलांची आई...सुखी संसार...परंतु शरीरसुखाच्या हव्यासापोटी ही तीन मुलांची आई, तिच्यापेक्षा १० वर्षे वयाने लहान असलेल्या युवकाच्या प्रेमात पडली आणि तिथेच अचानक सुखी संसाराला दृष्ट लागली, संसाराला गालबोट लागले...त्यांच्यातील प्रेमाची, संबंधाची कुणकुण दिव्यांग पतीला लागल्यानंतर पतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.शरीरसुख ही अशी बाब आहे, की त्यापुढे पैसा, प्रतिष्ठा, मानमरातब सर्वच काही शून्य होऊन जाते. शरीरसुखासाठी आपण कोणत्या कुटुंबातील आलो आहोत, आपल्यावर कोणते संस्कार झाले आहेत.मुलंबाळं, पती, पत्नी, आपले कुटुंब...या सर्वांचा विचार थिटा पडतो. अशीच काहीशी एक घटना गुरुवारी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात घडली. एका सुखवस्तू कुटुंबात घडलेली ही घटना आहे. शहरातील एका प्रतिष्ठित भागामध्ये एक महिला तिचा दिव्यांग पती आणि तीन मुलांसोबत राहते. पती चांगल्या नोकरीवर आहे. सुखी संसार...सुरू असतानाच, कुटुंबातील तीन मुलांच्या आईची, तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या युवकासोबत ओळख होते. हसणे, बोलणे, एकमेकांकडे पाहण्याचा नित्यक्रम त्यांच्यात सुरू झाला. हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ येत गेले. म्हणतात ना, प्रेम हे आंधळं असतं. तसंच दोघांचंही झालं. घर, कुटुंब, मुलं, संसार याचा कोणताही विचार न करता, हे दोघे कधी जवळ आले, हे त्यांना कळलेदेखील नाही. शरीरसुखासाठी आसुसलेल्या दोघांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या. कुटुंब, मुलांना वाऱ्यावर सोडून ही महिला युवकासोबत भाड्याने खोली घेऊन राहू लागली. पती, कुटुंबाने अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. समाजात बदनामी नको म्हणून पोलिसांत जाण्याचेही टाळले. प्रयत्न व्यर्थ ठरत असल्याचे पाहून पतीने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली, तेव्हा त्यांनी पूर्ण लव्ह स्टोरी कथन केली. मारू नका हो त्याला...प्रेम हे प्रेम असतं...प्रेमात जीव ओवाळून टाकायला मागे-पुढे पाहिल्या जात नाही. याचा प्रत्ययही पोलीस ठाण्यात आला. युवकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला चांगलेच खडसावले. हे पाहून महिलेला वाटले, की युवकाला आता पोलीस मारतील. त्यामुळे महिलेने पोलिसांना, मी माझ्या कुटुंबासोबत येथून निघून जाते. त्याला मारू नका हो... मी तुमच्या पाया पडते. त्याला काही करू नका, अशी विनवणी पोलिसांना केली.महिलेचा तक्रार देण्यास नकारयुवकाला ताब्यात घेतल्यानंतर संबंधित महिलेलासुद्धा पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. पोलिसांनी महिलेस युवकाविरुद्ध तक्रार देण्यास सांगितले; परंतु महिलेने तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी युवकावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.