ऑलाइन लोकमतअमरावती, दि. २६ : सुनेवर चोरीचा आळ घेऊन विष पिण्यास लावणाऱ्या सासूने सुनेचीच सत्वपरीक्षा घेतली. सुनेनेही स्वत:ला निर्दोष सिध्द करण्यासाठी सासूने दिलेले विष प्राशन केले. ही घटना यशोदा नगरात २३ जुलै रोजी उघडकीस आली. याप्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी सासूविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंदवून तिला अटक केली आहे. सोमवारी सासु पुष्पा प्रल्हाद येवतीकर हिला न्यायालयात हजर करण्यात आले. तिला २७ जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यशोदा नगरातील रहिवासी भारती बबलु येवतीकर हि महिला पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी आहे. भारतीवर सासूने चोरीचा आळ घेऊन तिची सत्वपरीक्षा घेतली. सासूचे कानातले हरविल्यानंतर तिने भारतीवर आळ घेतला. जर तु चोरी केली नसेल, तर विष प्राशन करून दाखवशिल, असे सासूने भारतीला म्हटले. ऐवढेच नव्हे, तर सासूने बाथरुममधील खिडकीत ठेवलेली विषारी औषधीची बॉटल भारतीला आणून दिले.
तु हे विष पिऊन दाखव तेव्हाच तू निर्दोष असल्याचे मी समजेल, अशी अट सासूने ठेवली होती. त्यामुळे स्वताला निर्दोष सिध्द करण्यासाठी भारतीला सासूने दिलेले विष प्राशन केले. मात्र, भारतीने विष प्राशन केल्यानंतर तिची काही वेळात प्रकृती बिघडली आणि तिला कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान भारतीचा मृत्यू झाला. त्यानंतर भारतीच्या कुटुंबीयांनी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात जावून सासुविरुध्द तक्रार नोंदविली.
याप्रकरणात पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचाऱ्यांनी येवतीकर कुटुंबीयांतील सदस्यांचे बयाण नोंदविले असता भारतीच्या मुलांनी ही हकिकत पोलिसांना सांगितली. सासुच्या त्रासामुळे सुनेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २३ जुलै रोजी उघडकीस आली. याप्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी सासु पुष्पा प्रल्हादसिंह येवतीकर यांच्याविरुध्द भादंविच्या कलम ३०६, ४९८ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार सासूने चोरीला आळ घेऊन सुनेला विष प्राशन करण्यास सांगितले. त्यामुळे सुनेने विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणात सासुला अटक करण्यात आली असून तिची पोलीस कोठडीत चौकशी सुरु आहे. प्रमेश आत्राम, पोलीस निरीक्षक, फे्रजरपुरा पोलीस ठाणे.