मुंबई : सीएसटी स्थानकातील विश्रामगृहात घडलेल्या प्रकरणात महिलेच्या मृत्यूच्या १० दिवस आधी कीटकनाशकांची फवारणी केल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. विश्रांतीगृहातील खोल्यांचे पेस्ट कंट्रोल १३ एप्रिल रोजी झाले. त्यानंतर खोल्या ७२ तास वापरायला न देता उघडयाच ठेवण्यात आल्या. १६ ते २२ एप्रिल या कालावधीत आठ जणांनी मुक्कामही केला. त्या काळात एका प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तो मुंबईत वैद्यकीय उपचारासाठी आल्याची माहीती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. हे पाहता आधी राहून गेलेल्या प्रवाशांना असा त्रास झाला नाही असा प्रश्न मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून उपस्थित झाला.
'ती' फवारणी १० दिवसांपूर्वीच
By admin | Published: April 28, 2016 6:24 AM