प्रसाद आर्वीकर - परभणी
घरची परिस्थिती हलाखीची, पतीचा नोकरीसाठी असलेला शोध, भिक्षा मागून होणारा उदरनिर्वाह. अशा बिकट परिस्थितीवर जिद्दीने मात करून आपले वेगळे विश्व निर्माण करणा:या परभणी येथील मालती गिरी यांचे कार्य इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल, असेच आहे.
नवरात्रौत्सव म्हणजे स्त्री-शक्तीचा जागर. स्त्री-शक्तीची अनुभूती देणा:या मालती गिरी यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. शहरातील गंगाखेड रोडवरील ताडेश्वर सव्र्हिस पॉइंट हा व्यवसाय मालती तुकाराम गिरी या सांभाळतात. 11 वर्षाच्या या अथक परिश्रमातून त्यांनी स्वत:चे वेगळे विश्व निर्माण केले आहे. उमरीजवळील बाभळगाव दळवे येथील निवृत्ती दत्तात्रय भारती यांची मालती ही कन्या. 1977मध्ये ताडपांगरी येथील तुकाराम गिरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. चौथीर्पयत शिकलेल्या मालती यांचे पती तुकाराम गिरी यांना नोकरी नव्हती. भिक्षा मागून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणो जिकिरीचे झाले होते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना वडिलांकडून व्यावसायिक गुण मिळालेल्या मालती गिरी यांनी सुरुवातीच्या काळात दूधविक्री, शिवणकाम यांसारखे छोटे व्यवसाय सुरू केले. परभणीत स्थायिक झाल्यानंतर 1981मध्ये तुकाराम गिरी यांना वीज कंपनीत लेबर म्हणून नोकरी लागली आणि पुढे ते चालक म्हणून सेवेत कायम झाले.
मालती गिरी यांना लहानपणापासूनच मशिनरी हाताळणो, दुरुस्ती करणो याबद्दल कुतूहल होते. चालक म्हणून सेवेत असताना तुकाराम गिरी यांनाही वाहनांच्या दुरुस्तीबद्दल माहिती होती. पतीप्रमाणो आपणही वाहनांची दुरुस्ती केली पाहिजे, असा अट्टाहास मालती यांचा असायचा. त्यांची आवड पाहून तुकाराम गिरी यांनी त्यांना वाहन दुरुस्तीचे धडे दिले. यातून मालती गिरी यांनी वाहन दुरुस्तीचे ज्ञान अवगत केले.
2क्क्4मध्ये गंगाखेड रोडवर त्यांनी सव्र्हिस पॉइंट टाकून चार चाकी वाहनांची देखभाल, स्वच्छता, दुरुस्ती आदी सेवा सुरू केली. त्या स्वत: 11 वर्षापासून हे सव्र्हिस सेंटर चालवित आहेत. या व्यवसायात जम बसवित त्यांनी कुटुंबाचा आर्थिक स्नेत उंचाविला.
च्मालती गिरी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, आज माझी मुले उच्चशिक्षित झाली यातच मला समाधान आहे. महिला म्हणून व्यवसायात काही अडचणी आल्या तर त्या कशा दूर करायच्या हे आपल्यावरच अवलंबून असते. वेगवेगळ्या स्वभावाची, विचाराची माणसे व्यवसायाच्या निमित्ताने भेटतात. त्यांच्या अनुभवातूनही आपल्याला शिकायला मिळते. प्रत्येकाकडून काही ना काही शिकत राहिल्यामुळे आज हे यश मिळाल्याचे मालती गिरी यांनी सांगितले.
च्केवळ आर्थिक प्रगती न करता मुलांना उच्च शिक्षण देण्याचे ध्येय समोर ठेवत त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. आज त्यांची मोठी मुलगी पूजा डॉक्टर असून, दुसरी मुलगी बेबी एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून एम.डी.चे शिक्षण घेत आहे. कैलास या मुलाने एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले आहे तर दुसरा मुलगा दत्तात्रय बीडीएसचे शिक्षण घेत आहे.