बारामती : भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा पुढील आठवड्यात बारामतीमध्ये येणार आहे. या यात्रेत मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. धनगर समाजाच्या मागण्या मान्य न झाल्याने भाजपच्या या महाजनादेश यात्रेत शेळ्या-मेंढ्या घुसविण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंबंधी बारामती येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन गुरुवारी (दि. २९) देण्यात आले. यांच्या प्रति मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना पाठविल्या आहेत.२०१४ रोजी बारामती येथे धनगर समाजाचे ऐतिहासिक आंदोलन झाले होते. त्यावेळी धनगर समाजातील बांधव आमरण उपोषणाला बसले होते. त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांनी आरक्षणाच्या मागणीचा विचार केला नाही. परंतु, तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनगर समाजाचे उपोषण सोडण्यासाठी बारामतीत आले. ‘मला सत्तेत बसवा, मी संपूर्ण अभ्यास करून आलोय, मी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविन’ असा शब्द दिला. त्यानंतर फडणवीस यांच्या हस्ते उपोषण सोडले. पण, गेल्या पाच वर्षांत २४० मंत्रिमंडळ बैठका झाल्या; परंतु आरक्षणाचा कोणताही निर्णय झाला नाही. धनगर समाजाची फसवणूक करण्यात आल्यामुळे धनगर समाजामध्ये नाराजी आहे. आम्हाला योजनांची भीक नको, एस.टी.चे सर्टिफिकेट पाहिजे, एस.टी.च्या सर्व सवलती आपोआप मिळतील. त्यामुळे आरक्षण महत्त्वाचे आहे, तरी आपण महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने बारामती येथे येत आहोत, तरी आपण बारामतीत येत असताना तुमच्या पक्षातील भाजपच्या एखाद्या धनगर समाजातील पदाधिकाºयांचे एस.टी.चे सर्टिफिकेट आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे घेऊन नाही आला, तर आम्ही आपल्या महाजनादेश यात्रेत शेळ्या-मेंढ्या घुसवून निषेध आंदोलन करू, समाजाच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. बारामतीच्या भूमीत आम्हाला शब्द दिला होता म्हणून आम्हाला महाजनादेश यात्रेला विरोध करण्याचा अधिकार असल्याचे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत शेळ्या-मेंढ्या घुसवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 3:01 PM
‘मला सत्तेत बसवा, मी संपूर्ण अभ्यास करून आलोय, मी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवीन’ असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता..
ठळक मुद्देभाजपच्या महाजनादेश यात्रेत शेळ्या-मेंढ्या घुसविण्याचा इशारा